भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण

भारत सरकारची संस्था

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ही भूशास्त्रीय सर्वेक्षण करणारी भारतातील केंद्रीय शासकीय संस्था आहे. हे भारताच्या केंद्रशासनातील खनिज मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. या संस्थेची स्थापना इ.स. १८५१ साली ब्रिटिश भारतात झाली. ही संस्था भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि त्याचा अभ्यास असे कार्य करते. अशा प्रकारच्या जगातल्या अतिशय जुन्या संस्थांपैकी एक आहे.

याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.

या संस्थेच्या इंग्रजी नावाचे संक्षिप्त रूप जीएसआय असे होते.