भारतीय अ क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२
भारत अ क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर २०२१ दरम्यान तीन प्रथम श्रेणी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. भारत अ संघाचे नेतृत्व प्रियांक पांचाल याने केले. सर्व सामने ब्लूमफाँटेन मधील मानगुआंग ओव्हल येथे झाले.
भारतीय अ क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२ | |||||
दक्षिण आफ्रिका अ | भारत अ | ||||
तारीख | २३ नोव्हेंबर – ९ डिसेंबर २०२१ | ||||
संघनायक | पीटर मलान | प्रियांक पांचाल | |||
प्रथम श्रेणी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | सारेल अर्वी (२५१) | हनुमा विहारी (२२७) | |||
सर्वाधिक बळी | लुथो सिपामला (९) | नवदीप सैनी (११) |
कर्णधार पीटर मलानच्या अफलातून शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिका अ संघाने पहिल्या प्रथम-श्रेणी सामन्यात पहिल्या डावामध्ये ५०९ धावांचा डोंगर उभा केला. भारत अ संघाने धिम्या गतीने फलंदाजी करत सामना अनिर्णित सोडवला. भारताकडून देखील अभिमन्यू इस्वरन याने शतक झळकावले. नोव्हेंबरच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगाचा ओमिक्रॉन नामक वेगळ्या प्रकारचा विषाणूचा झपाट्याने फैलाव होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे उर्वरीत दौऱ्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परंतु दोन दिवसांनीच दौरा वेळेप्रमाणे होईल असे बीसीसीआयतर्फे स्पष्ट करण्यात आले. ही घोषणा करण्यास विलंब झाल्याने दुसरा प्रथम-श्रेणी सामना २९ नोव्हेंबरच्याऐवजी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू करण्यात आला. शेवटचे दोन्ही सामने अनिर्णित सुटल्याने तीन सामन्यांची प्रथम-श्रेणी मालिकादेखील ०-० अशी बरोबरीत सुटली.
प्रथम-श्रेणी मालिका
संपादन१ला प्रथम-श्रेणी सामना
संपादन२३-२६ नोव्हेंबर २०२१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत अ, क्षेत्ररक्षण.
- उमरान मलिक (भारत अ) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
२रा प्रथम-श्रेणी सामना
संपादन
३रा प्रथम-श्रेणी सामना
संपादन