भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (ऐरोली)

ऐरोली, मुंबई मधील स्मारक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ऐरोली, नवी मुंबई येथील स्मारक आहे. हे स्मारक मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या मुख्य इमारतीमध्ये ४९ मीटर उंचीचा डोम उभारण्यात आला आहे. बाबासाहेब आंबेडकर विद्वत्तेचे प्रतीक आहेत. यामुळे डोमचा आकार पेनाच्या नीबप्रमाणे व उमलत्या कमळाप्रमाणे ठेवण्यात आला आहे.[] महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर १५ मध्ये हे स्मारक उभारण्याचे काम ६ एप्रिल २०११ रोजी सुरू केले. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्याचा १ नोव्हेंबर २०१४ रोजी लोकार्पन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. मात्र अंतिम टप्प्याचे किंवा संपूर्ण काम अद्याप पूर्ण झालेले नसून इ.स. २०१९ मध्ये ते पूर्णात्वास जाईल.[]

संरचना

संपादन

अडीच एकरांच्या या भूखंडावर स्मारक उभे आहे. मुख्य सभागृह, खुला सभामंडप आणि प्रार्थनागृह अशी रचना असून त्यात कलादालन, ग्रंथालय, कॅफेटेरीया आणि बाहेर असलेल्या विद्युत जनित्राच्या जागी हिरवळ तयार करण्यात आली आहे. यासाठी १८ कोटींची तरतूद करण्यात आली होती.[] स्मारकास मार्बल आच्छादन लावण्यात आले आहे.[]

५७५० चौ. मी. क्षेत्रफळावर ऐरोली सेक्टर १५ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची भव्य वास्तू उभारण्यात आली असून यामध्ये शिक्षण आणि ज्ञान हेच मानवाच्या प्रगतीचे मुख्य घटक आहेत असा संदेश प्रसारीत करणारा पेनच्या निबच्या आकाराचा डोम उभारण्यात आलेला आहे. स्मारकाच्या मुख्य इमारतीची डोमसह उंची ५० मीटर इतकी असून डोमच्या खाली पहिल्या मजल्यावर ३२५ चौ.मी. क्षेत्रफळाचे साधारणत: ३०० नागरिकांना ध्यानसाधना (मेडिटेशन) करता येईल असे प्रार्थना स्थळ विकसित करण्यात आले आहे. याशिवाय या वास्तूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील वस्तूंचे वस्तू संग्रहालय, कला दालन, दोन वाचनालये व अभ्यासिका, बहुउद्देशीय सभागृह, पोडीयम गार्डन अशा कल्पक बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.[]

आंबेडकर भवनमध्ये समावेश असलेल्या गोष्टी[]

  • भूखंडाचे क्षेत्रफळ: ५७५० चौरस मीटर
  • बांधकाम क्षेत्रफळ: २३१० चौरस मीटर
  • मुख्य हॉल - ३०० चौ.मीटर
  • कॉन्फरन्स रूम - ३७ चौ.मीटर
  • सर्विस एरिया - १७२ चौ.मीटर
  • व्हीआयपी रूम व कार्यालय - ६४ चौ.मीटर
  • पोडियम गार्डन - ८२५ चौ.मीटर
  • खुले सभागृह - ८५६ चौ.मीटर
  • प्रार्थना हॉल - ३२५ चौ.मीटर
  • वस्तुसंग्रहालय - २६४ चौ.मीटर
  • कलादालन - १३४ चौ.मीटर
  • कॅफेटेरिया - ११४ चौ.मीटर
  • वाचनालय - ११४ चौ.मीटर
  • वॉटर बॉडी - २७५ चौ.मीटर
  • डोम - ४९ मीटर उंच

पुरस्कार

संपादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वास्तूस "देशातील सर्वोत्कृष्ट आयकॉनिक वास्तू" म्हणून "इपीसी वर्ल्ड पुरस्कारा"ने सन्मानित करण्यात आले आहे.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "नवी मुंबईतल्या आंबेडकर स्मारकाच्या सजावटीचा प्रस्ताव तयार". लोकमत. 2018-11-03 रोजी पाहिले.
  2. ^ "आंबेडकर स्मारक यंदाही अपूर्णच". लोकसत्ता. 2019-05-08 रोजी पाहिले.
  3. ^ "डॉ. आंबेडकर भवनाचे १४ एप्रिलला लोकार्पण". लोकसत्ता. 2017-02-21. 2018-11-03 रोजी पाहिले.
  4. ^ "डॉ. आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल आच्छादन". लोकमत. 2018-04-11. 2018-11-03 रोजी पाहिले.
  5. ^ "नवी मुंबईतल्या आंबेडकर स्मारकाच्या सजावटीचा प्रस्ताव तयार". लोकमत. 2017-09-18. 2018-11-03 रोजी पाहिले.
  6. ^ "Dailyhunt". m.dailyhunt.in (इंग्रजी भाषेत). 2018-11-03 रोजी पाहिले.
  7. ^ http://www.nmmc.gov.in/news/-/asset_publisher/ZZ6c/content/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A4%BE-%E2%80%9C%E0%A4%87%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E2%80%9D?redirect=http%3A%2F%2Fwww.nmmc.gov.in%2Fnews%3Fp_p_id%3D101_INSTANCE_ZZ6c%26p_p_lifecycle%3D0%26p_p_state%3Dnormal%26p_p_mode%3Dview%26p_p_col_id%3Dcolumn-1%26p_p_col_count%3D1