भाट्ये समुद्रकिनारा

महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातीत अनेक समुद्र किनारे आहेत. त्यातील एक म्हणजे रत्‍नागिरी शहराच्या जवळच असणारा समुद्रकिनारा,"भाट्ये समुद्रकिनारा" हा एक प्रसिद्ध किनारा आहे.या ठिकाणी पांढऱ्या रंगाची वाळू आढळते .समुद्र किनारी असणारे सुरू झाडांचे वन आहे.किनाऱ्या जवळच असणाऱ्या झरी विनायक ठिकाणी किनाऱ्यानजीक झरी विनायकाचे सुंदर मंदिर आहे.किनाऱ्या जवळच समुद्राला काजळी नदी येऊन मिळते तेथेच भाट्येची खाडी तयार होते.ह्याठिकाणी देशातून व राज्यातून खूप पर्यटक आकर्षित होतात.

झरीविनायक मंदिर

संपादन

झरीविनायक मंदिर येथून जवळ आहे. प्रती गणपतीपुळे म्हणून हे देवस्थान प्रसिद्धी पावत आहे. येथे पर्वताच्या शिळेत उमटलेली जागृत गणेश प्रतिमा आहे. गाभाऱ्याच्या समोरच एक तळे आहे. गाभाऱ्याच्या जवळून वाहणाऱ्या गोमुखातून वाहणारे पाणी या तळ्यात साठते. हे तळे बारमाही पाण्याने भरलेले असते. जवळच समुद्र असूनही या झऱ्याचे पाणी गोडे आणि पिण्यायोग्य आहे हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. या झऱ्यामुळेच हे गणेश मंदिर झरीविनायक म्हणून ओळखले जाते. येथे गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.