भवानी तलवार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला भवानी तलवार म्हणतात. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या भवानी माता देवीने दिली असे इतिहासात वाचायला मिळते.
भवानी तलवार कशी होती?
संपादनभवानी तलवार कशी होती, हे कुणालाच माहीत नाही. इतिहासकार ग.ह. खरे सांगत, ""भवानी तलवारीचे प्रमाणभूत वर्णन आजही उपलब्ध नाही. परमानंदाच्या शिवभारतात आणि हरि कवीच्या शंभुराजचरित्रात हिचा उल्लेख आला असला, तरी त्यात हिची लांबी, रुंदी, धार, मूठ, पाते, पोलाद, तीवरील चिन्हे, जडाव वगैरेचे काम इत्यादी तपशील दिलेला नाही. शिवाय परंपरागत अशीही माहिती उपलब्ध नाही. म्हणून आज एखाद्याने एखादी तलवार पुढे आणून ती "भवानी' असल्याचे सांगितले, तर तज्ज्ञ त्याच्या शब्दास कधीच मान्यता देणार नाहीत. या तलवारीची प्रतिकृती आता उपलब्ध आहे.
बाह्य दुवे
संपादन- 'भवानी तलवारीचे गू्ढ' हा 'खट्टामिठा' अनुदिनीवरील भवानी तलवारीशी संबंधित लेख [१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |