भवानी-भारती हे श्रीअरविंद यांनी रचलेले भवानीरूप भारत मातेचे संस्कृत स्तोत्र आहे. उपजाती वृत्तातील हे ९९ श्लोकांचे स्तोत्र आहे. द.तु.नन्दापुरे यांनी हा मराठी पद्य-अनुवाद केला आहे.

काव्याचा इतिहास

संपादन

हे काव्य १९०५ च्या सुमारास लिहिले गेले. श्रीअरविंद कलकत्ता येथे असताना, तत्कालीन इंग्रज सरकारने घराची झडती घेऊन बरेचसे साहित्य जप्त केले, त्यामध्ये भवानी-भारती या काव्याचा समावेश होता. पुढे ऐंशी वर्षानंतर म्हणजे १९८५ साली हे जप्त झालेले साहित्य श्रीअरविंद आश्रमास मिळाले. पुढे आश्रमाने ते काव्य संस्कृत अन्वयार्थ आणि इंग्रजी भाषांतरासह प्रकाशित केले.

भवानी-भारती
लेखक श्रीअरविंद
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) भवानी-भारती
अनुवादक द.तु.नन्दापुरे
भाषा संस्कृत - मराठी
देश भारत
साहित्य प्रकार काव्य
प्रकाशन संस्था पायगुण प्रकाशन
प्रथमावृत्ती २०१६
पृष्ठसंख्या ८६

काव्याचा आशय

संपादन

दुर्गासप्तशती या स्तोत्रात देवी दुर्गा प्रकट होऊन महिषासुर आणि अन्य दुष्ट राक्षसांचा निःपात करते, तीच पौराणिक कल्पना घेऊन श्रीअरविंद यांनी इंग्रज शासनरुपी दुष्ट राक्षसाचा वध कालीमाता अर्थात भवानीमाता करते, असे काव्य रचले आहे.

पुस्तकाची मांडणी

संपादन

डाव्या बाजूस संस्कृत श्लोक आणि अर्थ आणि जाव्या बाजूस त्याच श्लोकाचा पद्य-अनुवाद अशी मांडणी आहे.

श्रीअरविंद यांनी अलिपूर तुरुंगात असताना लिहिलेल्या Invitation आणि Who या दोन इंग्रजी कवितांचा मराठी पद्य अनुवाद या पुस्तकात शेवटी देण्यात आला आहे. []

संदर्भ

संपादन
  1. ^ भवानी-भारती, द.तु.नन्दापुरे