ब्रिडी (आयरिश: An Bhréadaigh) हे उत्तर आयर्लंडमधील काउंटी टायरोनमधील एक छोटेसे गाव आहे. २०११ च्या जनगणनेत त्याची लोकसंख्या ९३ होती. हे स्ट्रबेन जिल्हा परिषद परिसरात आहे.

सेंट जोन्स (चर्च ऑफ आयर्लंड) चर्च, डून्नालॉन्ग, ब्रिडी

ब्रिडी क्रिकेट क्लबने प्रथम १९३८ मध्ये आयर्लंडच्या वायव्य भागात जुनियर लीग आणि चषक स्पर्धांमध्ये प्रवेश केला. १९८७ मध्ये नवीन पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यासाठी, व्हिव्ह रिचर्ड्स XI ब्रीडी येथे इयान बॉथम XI विरुद्ध खेळले. १९९६ मध्ये, क्लबने नॉर्थ वेस्ट सीनियर चषक जिंकला. मे २०१५ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने क्रिकेटच्या लहान स्वरूपाचे आयोजन करण्यासाठी मैदानाला मंजूरी दिली.

या मैदानावर ५ सप्टेंबर २०१६ रोजी आयर्लंड आणि हाँग काँग यांच्यातील पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना आयोजित करण्यात आला होता