ब्रम्ही विकिपीडिया ( ब्रम्ही : မြန်မာဝီကီပီးဒီးယား उच्चार : [mjəmà wɪkɨˈpiːdiə] ) विनामूल्य ऑनलाइन ज्ञानकोश विकिपीडियाची ब्रम्ही भाषेतील आवृत्ती आहे. ही आवृत्ती जुलै २००४ मध्ये सुरू केली गेली होती आणि एप्रिल २०२१ पर्यंत यात जवळपास १,००,००० लेख आहेत.

ब्रम्ही विकिपीडिया
ब्रम्ही विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा ब्रम्ही
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://my.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण जुलै, इ.स. २००४
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

एप्रिल २०२१ मध्ये यात ९१,००० वापरकर्ते, ४ प्रशासक आणि २,८४४ संचिका होत्या आणि लेखसंख्येनुसार हे ८५व्या क्रमांकाचे विकिपीडिया होते.[]

इतिहास

संपादन

काळक्रम

संपादन
  • २००४: ब्रम्ही विकिपीडियाची सुरुवात.
  • २००५: ब्रम्ही विकिपीडियामध्ये काहीजण सामील झाले व त्यांनी लिखाण सुरू केले.
  • २००८: मजकूर मोठ्या प्रमाणात वाढले.
  • २०१०: विकिमीडिया फाउंडेशनमधील लोकं, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय युनिकोड तज्ञ आणि बर्मी विकिपीडियावापरकर्त्यां सोबत प्रथम ब्रम्ही विकिपीडिया कार्यशाळा बँगकॉक, थायलंड येथे आयोजित करण्यात आली.
  • २०१२: ब्रम्ही विकिपीडिया बरकॅम्प यांगून येथे सुरू करण्यात आली .

कार्यक्रम आणि जाहिराती

संपादन

म्यानमार संगणक व्यावसायिक संघटनेने २०१० मध्ये विकिपीडियाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने विकिपीडिया म्यानमार प्रकल्प सुरू केले.[]

जून २०१४ मध्ये ब्रम्ही विकिपीडिया समुदायाने टेलेनॉर म्यानमारच्या सहाय्याने यंगून, म्यानमार येथे नवीन स्वयंसेवक भरती करण्यासाठी त्यांची प्रथम संयुक्त कार्यशाळा आयोजित केली होती.[] जुलै २०१४ मध्ये डॅगन विद्यापीठात ब्रम्ही विकिपीडिया फोरम आयोजित करण्यात आला होता, त्यात विद्यार्थ्यांसह २,०००हून अधिक लोक आकर्षित झाले.[]

आव्हाने

संपादन

बर्मीचे बहुतेक इंटरनेट वापरकर्ते नॉन-युनिकोड झॉग्यी फॉन्ट वापरतात म्हणून त्यांना बर्मी विकिपीडिया पाहण्यात अडचण येते.[][][]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wikipedia Statistics - Tables - Burmese". wikimedia.org. 2018-12-25 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2015-03-14 रोजी पाहिले.
  2. ^ a b The Myanmar Times. "Myanmar Wikipedia project targets 15,000 pages". mmtimes.com. 2018-12-25 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2015-03-14 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "themyanmartimes" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. ^ "Telenor Group - Bringing Wikipedia to Myanmar". Telenor Group. 2018-12-25 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2015-03-14 रोजी पाहिले.
  4. ^ a b Win Htut. "Telenor hosts Wikipedia forum at Dagon University". Eleven Myanmar. 2018-12-25 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2015-03-14 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "winhtut" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  5. ^ The Myanmar Times. "Spark of knowledge starts with Wikipedia". mmtimes.com. 2015-02-28 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2015-03-14 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन