बोल महामानवाचे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे हे अर्थशास्त्रज्ञ नरेंद्र जाधव यांनी अनुवाद व संपादन केलेला ग्रंथ आहे. या ग्रंथाचे एकूण तीन खंड आहेत – १) आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन, २) सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि कायदा-संविधान विषयक भाषणे ३) राजकीय. हा ग्रंथ मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन दिनी २४ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रकाशित करण्यात आला.

बोल महामानवाचे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५०० मर्मभेदी भाषणे
लेखक डॉ. नरेंद्र जाधव
भाषा मराठी
देश भारत
प्रकाशन संस्था ग्रंथाली प्रकाशन
प्रथमावृत्ती २४ ऑक्टोबर २०१२
विषय भाषणे
पृष्ठसंख्या १,६७० (खंड १, २ व ३ एकत्रित)[]

डॉ. आंबेडकरांच्या मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषणांची समग्रसूची कालक्रमानुसार पहिल्यांदाच या ग्रंथत्रिवेणीत सादर करण्यात आली आहे. बाबासाहेबांच्या एकूणएक उपलब्ध ५३७ भाषणांपैकी त्रांतिक व खूप त्रोटक स्वरूपाची ३७ भाषणे वगळून उरलेली ५०० भाषणे या ग्रंथत्रिवेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या ५०० भाषणांपैकी मूळ २३६ भाषणे फक्त मराठीत, १०२ भाषणे केवळ इंग्रजीत, तर ११२ भाषणे मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ इंग्रजीत उपलब्ध असलेल्या १०२ भाषणांचा मराठी अनुवाद करून, ही सारी ५०० भाषणे मराठी भाषेत या तीन खंडांमध्ये संपादित करण्यात आली आहे.

पहिला खंड

संपादन

आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन या खंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःविषयी केलेले आणि अनुयांसाठी केलेले प्रबोधनात्मक विवेचन आहे. युवाशक्तीला विधायक कार्यासाठी केलेले मार्गदर्शन व महिलांसाठी वेळोवेळी व्यक्त केलेले उद्बोधक विचार आहेत. तसेच, आंबेडकरी चळवळीसाठी आवश्यक संस्थात्मक वास्तू असावी म्हणजे इमारत उभारणीच्या निधीसंकलनासाठी केलेली भाषेत या खंडात आहेत.

दुसरा खंड

संपादन

सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि कायदा-संविधान विषयक भाषणे

तिसरा खंड

संपादन

राजकीय या खंडात दलितांना हक्क मिळवून देण्यासाठीची घणाघाती आहेत. म. गांधी, पं. नेहरू, बॅ. जीना यांच्या विचारांवर केलेले राजकीय भाष्य आहेत.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन