बॉक्सकार इंग्लिश: Bockscar हे अमेरिकेच्या वायुसेनेचे बी-२९ प्रकारचे एक विमान आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी या विमानातून जपानच्या नागासाकी शहरावर फॅट मॅन नावाचा अणुबॉम्ब टाकण्यात आला होता.

हे विमान नेब्रास्कातील बेलेव्ह्यू शहरात बांधण्यात आले होते व १९ मार्च, १९४५ रोजी वायुसेनेस देण्यात आले. एप्रिलमध्ये हे विमान ३९३व्या बॉम्बफेकी स्क्वॉड्रनमध्ये शामिल केले गेले.

युद्ध संपल्यावर हे विमान राइट-पॅटरसन वायुसेना तळावर प्रदर्शनासाठी ठेवण्यात होते. त्यानंतर हे विमान डेटन, ओहायो येथे फॅट मॅनच्या प्रतिकृतीशेजारी ठेवण्यात आलेले आहे.