बेनॉ-कादिर चषक ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यापासून खेळविण्या जाणाऱ्या पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. सदर चषक ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रिची बेनॉ आणि पाकिस्तानी खेळाडू अब्दुल कादिर यांच्या नावाने खेळवला जातो.

पार्श्वभूमी

संपादन

सन १९५६ पासून ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये कसोटी मालिका खेळवण्याची सुरुवात झाली. इसवी सन १९५६ ते इसवी सन २०१९ या ६३ वर्षांच्या कालावधीत दोन्ही देशांमध्ये एकूण २५ कसोटी मालिका खेळवल्या गेल्या. पैकी ऑस्ट्रेलियाने १३, पाकिस्तानने ७ कसोटी मालिका जिंकल्या तर ५ कसोटी मालिका अनिर्णित सुटल्या. कसोटी सामन्यांचे बघता सदर देशांनी एकूण ६६ कसोटी सामने खेळले. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ३३ तर पाकिस्तानने १५ कसोटीत विजय मिळवला तथापि १८ कसोटी सामने हे अनिर्णित सुटले. दोन्ही देशांमधील पहिला वहिला कसोटी सामना ११ ऑक्टोबर १९५६ रोजी कराची येथे झाला ज्यात पाकिस्तानने ९ गडी राखून विजय मिळवला.

१९५६ पासून पाकिस्तानने एकूण १२ मालिकेचे यजमानपद भूषविले. परंतु सन २००२ पासून २०१८ पर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानच्या घरच्या मालिका या संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका, आणि इंग्लंड येथे झाल्या. तर १९६४ पासून ऑस्ट्रेलियाने एकूण १३ वेळा मालिका आयोजित केली.

बेनॉ-कादिर चषक निकाल

संपादन
Series हंगाम स्थळ एकूण सामने ऑस्ट्रेलिया विजयी पाकिस्तान विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
२०२१-२२ पाकिस्तान ऑस्ट्रेलिया