Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


बॅनुवांगी रीजेंसी हे इंडोनेशियातील पूर्वी कडील जावा प्रांतातील एक प्रशासकीय (इंडोनेशियन: कबाबेटेन) भाग आहे. ही रीजेंसी जावा बेटाच्या पूर्वेकडील भागावर स्थित आहे. हे जावा आणि बाली दरम्यान बंदराचे कार्य करते. याच्या पश्चिमेला पर्वत व जंगलांनी आहेत आणि समुद्र पूर्वेला आणि दक्षिणेला आहे. बॅनुवांगी बालीपासून एका चिंचोळ्या भागाने विभागलेली आहे. याचे क्षेत्रफळ ५७८२.४ वर्ग किमी आहे, याचेमुळे ही रीजेंसी जावा मधील सर्वात मोठी आहे. २००० च्या जनगणनेनुसार याची लोकसंख्या १४,८८,७९१ होती. २०१० च्या जनगणनेनुसार ती १५,५६,०७८ पर्यंत वाढली होती. नवीनतम अधिकृत अंदाजा नुसार (जानेवारी २०१४ ला) याची लोकसंख्या १५,९९,७८८ आहे. बॅनुवांगी शहर ही प्रशासकीय राजधानी आहे. बॅनुवांगी चा जावानीज भाषेतील अर्थ "सुगंधित पाणी" असा आहे. तसेच हे नाव श्री तंजंगच्या जावातील लोककथाशी जोडलेले आहे.

इजेन ज्वालामुखीच्या जवळील सकाळचे धुके

समाज आणि इतिहाससंपादन करा

बॅनुवांगी चा मूळ गट हा ओसिंग समुदायाचा आहे ज्यात हिंदू संस्कृतीचा प्रभाव आहे. तरीही त्यांना जावानी उप-जातीय गट मानले जाते. ते मुख्यतः बॅनुवांगीच्या मध्य भागात राहतात आणि ते स्वतः ला माजापाहितचे वंशज मानतात. इतर गट म्हणजे जावानी जे मुख्यतः दक्षिणेला आणि पश्चिमेला राहतात, मदुरसे जे मुख्यतः उत्तर आणि किनार्यावरील क्षेत्रात राहतात आणि बालीनी जे विखुरलेले आहेत परंतु पूर्वेकडे अधिक प्रमाणात राहतात. इतर लहान गट म्हणजे चीनी, बगिनीज आणि अरब हे आहेत.

एके काळी ब्लामबंगन (किंवा त्याचे रूपांतर: बलंबंगन आणि बलुंबुनगण) म्हणून ओळखले जाणारे शहर, जे मजपहाइट साम्राज्य होते आणि प्रादेशिक व्यापाराचे केंद्र होते. मजापहट साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर, ते एक स्वतंत्र राज्य बनले. ते जावातील शेवटचे हिंदू साम्राज्य होते. डेमकच्या सुल्तानाच्या सैन्यापासून स्वतः च्या बचावासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि यासाठी त्यांनी बालीतील राजांकडून मदत मागितली. याच कारणा मुळे त्यांना नंतर बालीच्या साम्राज्यांत विलिन व्हावे लागले. या काळात ब्लॅबॅंगन बालि संस्कृतीचा प्रभाव येथे मोठ्या प्रमाणात पडला. जवळजवळ १५० वर्षांच्या बालिच्या ताब्यात राहिल्यानंतर, मातरमच्या सुल्तानाने या प्रदेशाचा ताबा मिळवला आणि त्याचे नाव बदलून बॅनुवांगी ठेवले. नंतर, ते व्हीओसी (१७७०) द्वारे मातरम भागाचा बनला होता. १९ व्या शतकातील वृक्षारोपणानंतर, बानुवांगीच्या अनेक भागात कॉफी आणि उसाची लागवड करण्यात आली, जे आजही तसेच आहेत. या कालखंडात चिनी आणि अरब लोक येथे आले.

बॅनुवांगी लोक इस्लामिक आणि पूर्व-इस्लामिक परंपरेच्या त्यांच्या संगमासाठी ओळखले जातात.

सुहार्तोच्या पतना दरम्यान, कथित जादूगारांच्या विरोधात बॅनुवांगी मध्ये प्रचंड दंगली आणि हिंसाचार घडला. कथित जादूगारांच्या व्यतिरिक्त, इस्लामिक गुरु देखील लक्ष्य झाले आणि ठार मारले गेले. नहदुलातुला उलामाच्या सदस्यांचा दंगली करणाऱ्यांकडून खून केला गेला. [१][२]

संदर्भसंपादन करा

  1. ^ http://www.insideindonesia.org/weekly-articles/the-banyuwangi-murders
  2. ^ "Breaking News, Analysis, Politics, Blogs, News Photos, Video, Tech Reviews - TIME.com". Time. October 19, 1998.