बुल्ले शाह (मराठी लेखनभेद: बुल्लेशाह ; गुरुमुखी पंजाबी: ਬੁੱਲ੍ਹੇ ਸ਼ਾਹ ; शाहमुखी पंजाबी: بلہے شاہ ; रोमन लिपी: Bulleh Shah ;) (इ.स. १६८० - इ.स. १७५७) हे एक सूफी तत्त्वज्ञ व पंजाबी भाषेतील कवी, मानवतावादी होते.

बुल्ले शाह यांची कबर

त्यांचे संपूर्ण नाव अब्दुल्ला शाह होय. ते मीर बहली शाह ह्या नावानेही ओळखले जात. त्यांच्याबद्दल जास्त किंवा विश्वासार्ह माहिती उपलब्ध नाही. परंतु तत्कालीन विद्वानांच्या मते बुल्ले शाह यांचा जन्म इ.स. १६८० साली उच, बहवालपूर, पंजाब येथे पिता शाह मुहम्मद दरवेश यांच्या पोटी झाला. शाह मुहम्मद दरवेश यांना अरबी, फारसी भाषा व कुराणाचे ज्ञान होते. उदरनिर्वाहार्थ त्यांनी सहकुटुंब कसूर, पाकिस्तान येथे प्रयाण केले. बुल्ले शाह यांनी आपले जीवन कसूर येथे व्यतीत केले.

बुल्ले शाहांच्या काव्यरचना पंजाबी व सूफी लोकपरंपरेचा आणि साहित्याचा एक अविभाज्य भाग आहेत. हिंसेचे उत्तर हिंसा होऊच शकत नाही ह्या त्यांच्या विचाराशी ते इतरांचा रोष पत्करूनही कायम ठाम राहिले. त्यांनी आपल्या काव्यांतून कायम मानवतेचा, प्रेमाचा, सौहार्दाचा पुरस्कार केला. सामाजिक प्रश्नांवर टीकाटिप्पणी केली. त्यांच्या काव्यरचना इस्लामाच्या सध्याच्या कट्टरतेला आव्हान देणाऱ्या व त्यावर टीका करणाऱ्या आहेत. त्यांच्या काव्यात त्यांनी रचलेल्या 'काफीयॉं' (काफी प्रकारातील काव्य) सर्वाधिक प्रसिद्ध आहेत.

बुल्ले शाहांचा मृत्यू इ.स. १७५७ मध्ये झाला.

बाह्य दुवे

संपादन