बुलढाणा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर.
(बुलडाणा (निःसंदिग्धीकरण) या पानावरून पुनर्निर्देशित)

बुलढाणा शहर हे महाराष्ट्र राज्यातील बुलडाणा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराचे पूर्वीचे नाव 'भिलठाणा' असे होते. त्याचे इंग्रज काळात 'बुलढाणा' असे नामांतर करण्यात आले. हे एक थंड हवेचे ठिकाण होते. आजही विदर्भात सर्वात कमी तापमान बुलडाणा शहराचे असते. बुलडाणा शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. १. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३अ मलकापूर - बुलडाणा -जालना- औरंगाबाद आणि २. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ई अजिंठा-बुलडाणा-खामगाव जातो जो खामगावहुन पुढे अचलपूर मार्गे मध्य प्रदेशातील बैतुल शहरास जातो.

हा लेख बुलढाणा शहराविषयी आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


ए आर डी सिनेमा गृह

बुलढाणा शहरात तिरुपतीच्या धर्तीवर मलकापूर-बुलडाणा राष्ट्रीय महामार्गावर राजूर घाटात टेकडीवर श्री भगवान बालाजी यांचे नयनरम्य असे मंदिर बांधण्यात आले आहे. जे आज एक प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळ आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वांत उंच असलेले शिखर हे लोणारकर टॉप या नावाने ओळखले जाते. हे शिखर 900 मीटरपेक्षा अधिक उंचीवर आहे. हे शिखर जिल्ह्यात सर्वांत उंच असल्याचे पहिल्यांदा 'लोणारकर टीमने' शोधून जाहीर केले. म्हणून या शिखराला 'लोणारकर टॉप' किंवा 'लोणारकर शिखर' असे नाव पडले आहे. अंबाबरवा अभयारण्यात शिरल्यावर जटाशंकर मंदिराच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर हे शिखर आहे. तेथे वर त्रिकोणी आकाराचं पठार आहे. इथून आजूबाजूचा परिसर अतिशय नयनरम्य व अद्भुत दिसतो.

भाषा आणि संस्कृती

संपादन

बुलढाण्यात बोलली जाणारी सर्वात सामान्य भाषा म्हणजे मराठी भाषा. शहरी लोकांपैकी ९८ टक्क्यांहून अधिक लोक प्रथम भाषाच मराठी बोलतात. मराठी हा इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकविला जाणारा अनिवार्य विषय आहे. १ टक्का लोकसंख्या हिंदी भाषा बोलते. व्यावसायिक स्थितीमुळे बुलडाणा मधील सर्व हिंदी भाषिक अस्खलित मराठी बोलू शकतात.[]

हे सुद्धा पहा

संपादन

बुलढाणा जिल्हा

  1. ^ "Andh". Ethnologue (इंग्रजी भाषेत). 2021-04-10 रोजी पाहिले.