बिनतारी यंत्रणेचा विकास

मायक्रो कॉम्प्यूटर इतर कॉम्प्यूटर बरोबर माहिती विभागून वापरू शकतो.हि क्षमता जोडणीमुळे येते. मोबाइल तसेच इतर बिनतारी यंत्रणांचा सर्वदूर वापर यामुळे गेल्या पाच वर्षात जोडणीचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे. बिनतारी क्रांतीची ही टर केवळ सुरुवात आहे, असं या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. या क्रांतीमुळे संपर्क यंत्रणा आणि कॉम्प्यूटरचा वापर या दोन्हींमध्ये कमालीचा बदल होणार आहे अशी तज्ञांची खात्री आहे.

नेटवर्क किंवा कॉम्प्यूटर नेटवर्क हे या जोडणीच्य केंद्रस्थानी आहेत. नेटवर्क या संपर्क यंत्रणेमुळे दोन अथवा अधिक कॉम्प्यूटर्स एकमेकांना जोडता येतात. जगातले सर्वात मोठे नेटवर्क म्हणजे इंटरनेट. इंटरनेट म्हणजे प्रचंड मोठा हमरस्ता, ज्याद्वारे जगभरातील लोक आणि संस्थांशी तुम्हाला संवाद साधता येतो. वेब अर्थात वर्ल्ड वाईड वेबमुळे इंटरनेट वापरासाठी मल्टीमिडिया इंटरफेस मिळतो.

संदर्भ:एम.एस.सी.आय.टी. पुस्तक