बाह्य वर्तुळाकार मार्ग (नागपूर)
नागपूरचा बाह्य वर्तुळाकार मार्ग किंवा आऊटर रिंग रोड (ओआरआर) हा महाराष्ट्रातील नागपूर शहराभोवती फिरणारा प्रस्तावित वर्तुळाकार मार्ग आहे. या रस्त्याचे बांधकाम सध्या २०१९ साली सुरू आहे. रस्त्याचा एक भाग राष्ट्रीय महामार्ग ४४ (शहराच्या दक्षिण दिशेला) आणि दुसरा भाग राष्ट्रीय महामार्ग ५६ (शहराच्या पूर्व दिशेला) आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ६१ किमीच्या उर्वरित पट्टीच्या अंमलबजावणीसाठी कार्य आदेश जारी केले आहेत. हा नागपूर शहरातील सर्वात मोठा रस्ता प्रकल्प आहे. याच्या कामाची ऑर्डर १,१७० कोटी रुपयांची आहे.
हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ७ ४४, राष्ट्रीय महामार्ग ५३, राष्ट्रीय महामार्ग ४७, महाराष्ट्र राज्य महामार्ग ३, ९, २४८, २५५ आणि २६४ या मार्गांशी जोडला जाईल. शिवाय तो आणि निर्माणाधीन मुंबई–नागपूर द्रुतगतीमार्गाशी सुद्धा जोडला जाईल .
मार्ग
संपादनया प्रकल्पांतर्गत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एक नवीन ४० किलोमीटरचा सिमेंटचा चौपदरी रास्ता अमरावती मार्गावरील गोंडखैरी पासून राष्ट्रीय महामार्ग ४४ च्या कामठी-जबलपूर भागावर भिलगाव-शिरपूर पर्यंत तयार केला जाईल. हा मार्ग फेत्री द्वारे कळमेश्वर - काटोल मार्ग, भरतवाडा, कोराडी व राष्ट्रीय महामार्ग ४७ वरून जाईल. गोंडखैरी ते गावसी मानापूर भागात २-पदरी राष्ट्रीय महामार्ग ४४चे चौपदरी मार्गात रुंदीकरण करण्यात येईल आणि या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात येईल. निर्माणाधीन महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूरकडचे टोक या रस्त्याशी जोडले जाईल. [१]
या बाह्य वर्तुळाकार मार्ग प्रकल्पाच्या अंतर्गत ५ रेल्वे ओव्हरब्रिजेस, २० छोटे पूल आणि १५ अंडरपास तयार होणार आहेत. [२]
हे सुद्धा बघा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ News, Nagpur. https://www.nagpurtoday.in/nagpur-outer-ring-road-mep-infra-to-do-4-laning-of-28-km-stretch/01191640,%20https://www.nagpurtoday.in/nagpur-outer-ring-road-mep-infra-to-do-4-laning-of-28-km-stretch/01191640. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Outer-Ring-Rd-contracts-awarded/articleshow/51734963.cms. Missing or empty
|title=
(सहाय्य)