बराबर लेणी

(बाराबार लेणी या पानावरून पुनर्निर्देशित)

बराबर लेणी भारतातल्या बिहार राज्यातील जेहानाबाद जिल्ह्यातील मखदूमपूर जवळ असलेल्या लेणी आहेत. डोंगर खडकामधील ह्या लेणी भारतातील अजूनही टिकून असलेल्या सर्वात प्राचीन लेणींपैकी एक आहेत. ह्या लेणी मौर्य काळापासून (इ.स.पू. ३२२ ते १८५) अस्तित्वात आहेत. गयेच्या उत्तरेकडे १८ कि.मी. अंतरावर या गुहा आहेत आणि त्यातील काही भिंतीवर सम्राट अशोकांनी कोरून घेतलेला काही मजकूर आहे. या गुहा सम्राट अशोकाने बौद्ध धर्मातील आजीवक पंथीयांसाठी खोदलेल्या होत्या.

बाराबार लेणी

इतिहास

संपादन

या लेणी बाराबार आणि नागार्जुनी या जुळ्या डोंगरांवर खोदलेल्या (कोरलेल्या) असून ख्रिस्तपूर्व ३ ऱ्या शतकात, मौर्य कार्यकाळातील आहेत. मौर्य सम्राट अशोक आणि त्यांचा मुलगा दसरश हे दोघे स्वतः बौद्धधर्मीय होते; पण धार्मिक सहिष्णुतेच्या त्यांचा धोरणामुळे त्यांनी वेगवेगळ्या वैदिक (हिंदू) व जैन संप्रदायांना ही आपल्या राज्यात स्थिरावण्यास, परवानगी दिली होती. त्यामुळे आजीविका संप्रदायातले सन्यासी या गुहा (लेण्या) वापरत असत. हा आजीविका संप्रदाय मख्खली गोसाला यांनी स्थापन केला होता. गोसाला हे बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध व २४ वे जैन तीर्थंकर वर्धमान महावीर यांचे समकालीन होते. या लेण्यात दगडांना कोरून बनवलेली बौद्ध व हिंदू शिल्पेही आहेत.

पॅसेज टू इंडिया

संपादन

ई. एम. फॉर्स्टर यांनी लिहिलेल्या ‘पॅसेज टू इंडिया’ या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर या लेणीच्या परिसराचे चित्र आहे. तसेच पुस्तकात अनेक महत्त्वाची चित्रे समाविष्ट केलेली आहेत. लेखकाने स्वतः या ठिकाणास भेट देऊन तिथली छायाचित्रे काढून ‘बाराबार लेणी’ या नावाचे त्यांच्या पुस्तकात वापरली आहेत.

बाराबारमधील बहुतेक सर्वच लेणींत दोन खोल्या आहेत, ज्या पूर्णपणे ग्रॅनाईट या दगडात कोरलेल्या आहेत आणि आतील पृष्ठभागाला उत्तमपणे पॉलिश केलेले आहे. पहिली खोली म्हणजे उपासक-उपासिका यांना एकत्रपणे बसता यावे, असे मोठे आयताकृती दालन आहे आणि दुसरी खोली त्याहून थोडी लहान, गोलाकार, घुमटासारखे छत असलेली आहे. या आतल्या खोलीत काही ठिकाणी छोट्या स्तूपासारखी रचना आहे. मात्र आज या सगळ्या लेणी ओस पडलेल्या आहेत.

यातील काही लेण्या

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन

बाह्य दुवे

संपादन