बापू वाटवे
बापू वाटवे ( इ.स. १९२४; - पुणे, ४ मार्च, २००९) हे चित्रपटविषयक लेखन करणारे एक प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते.
लेखिका शालिनी वाटवे त्यांच्या पत्नी व पुण्यातील डॉक्टर संजय वाटवे हे त्यांचे चिरंजीव.. अभिनेता देव आनंद व बापू यांची खास मैत्री होती.
बापू वाटवे प्रभात फिल्म्स्च्या ‘हम एक हैं’ आणि ‘आगे बढो’ या दोनही हिंदी चित्रपटांचे साहाय्यक दिग्दर्शक होते.
बापू वाटवे यांना त्यांच्या हयातीत चित्रपटाचा हालता बोलता ज्ञानकोश म्हणत.
‘कथालक्ष्मी’ नावाचे मासिक बापूंनी संपादक म्हणून २० वर्षे चालवले. ते १९८६ साली चित्रपट पुरस्कार समितीचे ज्यूरी होते.
बापू वाटवे यांनी लिहिलेली काही पुस्तके
संपादन- एक होती प्रभात नगरी (प्रभात टॉकीजचा इतिहास)
- भारतीय चरित्रमाला दादासाहेब फाळके
- भारतीय सिनेमाचे जनक फाळके (या पुस्तकाची भारतातल्या १४ भाषांत भाषांतरे झाली आहेत.)
- V. Damle and S. Fattelal: A Monograph (इंग्रजी)
पुरस्कार
संपादन- ‘भारतीय सिनेमाचे जनक फाळके’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
(अपूर्ण)