आदिलशहा चा सरदार आदिलशाहाने घोरपडे सरदारांना दिलेल्या मुधोळ जहागिरीतून या संस्थानाचा उदय झाला. बाजी घोरपडे याने १६४८मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसल्यांचा घात करून कैद करून विजापूरी नेले. त्याचा वचपा शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये खवासखानच्या साह्यासाठी निघालेल्या बाजीचे घोरपडे चे सैन्य मधल्यामध्ये कापून काढले. मुधोळचीही नासधूस केली व बाजी घोरपडे चा वध केला.