बळीराम हिरामण पाटील (1898-1973) हे समाजसुधारक, विचारवंत व इतिहास संशोधक होते. साहित्य , समाज व संस्कृती या क्षेत्रात त्यांचे बहुमूल्य योगदान आहे. त्यांचे मुळ आडनाव राठोड असून वडिल कर्मयोगी हिरामण नायक -पाटील  यांना 1913-14  च्या दरम्यान निजामांनी पाच हजार एकरची ईजारदारी व बावन गावाची पाटीलकी दिली होती. त्यामुळे ते पाटील म्हणून ओळखले जाऊ लागले.

1920-1936 या कालावधीत त्यांनी भारतभर दौरे करीत तत्कालीन बॉम्बे, मद्रास, म्हैसूर,  कलकत्ता, पंजाब अशा वेगवेगळया गैझेटियरचा, जनगणनेचा अभ्यास केला.गोर बंजारा समाजाचा वैभवशाली इतिहासाचे संशोधन करून त्यांनी "गोर बंजारा लोकांचा इतिहास" या ऐतिहासिक ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली.[] त्यामुळे ते बंजारा समाजाचे आद्य इतिहासकार म्हणून संबोधले जाते. बंजारा इतिहास, साहित्य व संस्कृती क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. बंजारा साहित्य आणि संस्कृतीला गतवैभव मिळण्यास त्यांच्यापासून सुरुवात झाली. त्यामुळे 'प्रख्यात प्रागतिक विचारवंत व इतिहास संशोधक बळीराम पाटील ते आजच्या नव्या पिढीतील सर्जनशील साहित्यिक व गोर बंजारा साहित्य अकादमीचे शिल्पकार एकनाथ पवार ' हा बंजारा साहित्य, संस्कृतीला समृद्ध करणारा मौलिक कालखंड मानला जातो.[]

आधुनिक कृषिप्रधान भारताचे कृषीसंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानायक वसंतराव नाईक यांना समाजसुधारणांच्या कार्यात त्यांनी बहुमूल्य सहयोग केले. जलक्रांतीचे जनक , माजी राज्यपाल सुधाकरराव नाईक हे त्यांचे जावई होत. पुढे त्यांचे जेष्ठ पुत्र उत्तमराव राठोड यांनी आमदार , खासदार (1980-1991) म्हणून नावलौकिक मिळविला. स्वातंत्र्यपूर्व काळात 1935 साली स्वतःच्याच घरात थोर समाजसुधारक व विचारवंत बळीराम पाटील यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली. रंजल्या गांजल्या लोकांची सेवा सुश्रृषा व्हावी याकरीता दवाखाना उभारला. मांडवी, (आदिलाबाद तेलंगणा) येथे जिनिंग प्रेसिंगची स्थापना करून हजारो लोकांना रोजगार दिला. स्वातंत्र्यानंतर 1955 साली वडिलांच्या नावे हिरा वाचनालयाची स्थापना करून वाचन संस्कृती रूजवली. बहुजन समाजात शैक्षणिक व सामाजिक सुधारणा घडवून आणण्यात त्या़ंनी मोलाचे योगदान दिले. 17 जानेवारी 1973 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ पाटील, बळीराम हिरामण (1936). गोर बंजारा लोकांचा इतिहास. मांडवी.
  2. ^ Chavan, M R (August 2024). "History and Inspiration of modern Banjara Literature". Kunteda. 4: 5–6.
  3. ^ राठौड, हरीसिंग (2023). हम गौर बंजारे. मुंबई: ओंकार प्रिंट्स.