बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम
बर्म्युडा राष्ट्रीय मैदान, बर्म्युडा नॅशनल स्टेडियम तथा बर्म्युडा नॅशनल स्पोर्ट्स सेंटर हे बर्म्युडामधील बहुक्रीडा मैदान आहे. देशाची राजधानी हॅमिल्टनजवळ असेलेले हे मैदान मुख्यत्वे फुटबॉल आणि मैदानी खेळांसाठी वापरले जाते. या मैदानावर २००४मध्ये युसेन बोल्टने २०० मीटर धावण्याची शर्यत १९.९४ सेकंदात संपवून विश्वविक्रम रचला.
क्रिकेट मैदान
संपादनया मैदानाच्या उत्तरेस क्रिकेटचे वेगळे मैदान आहे. बर्म्युडा क्रिकेट संघ त्या मैदानाचा वापर करतो.