बम्लेश्वरी देवस्थान, सुकळी नकुल

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल गावात वैनगंगा नदी काठावर बम्लेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात अनेक वर्षांपासून यात्रेचे आयोजन करण्यात येते.[]

यात्रा

संपादन

सुकळी नकुल येथील वैनगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या माता बम्लेश्वरी देवस्थानात दरवर्षी मकरसंक्रांत निमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येते. भाविकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी ट्रस्टच्या वतीने उपाययोजना करण्यात येतात. वैनगंगा नदी पात्रात पाणी अडविण्यात आल्याने अनुचित घटना टाळण्यासाठी स्वयंसेवक नियुक्त केले जातात. भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि व्यवसायिकांना विजेची सोय उपलब्ध करून देण्यात येते. पाच दिवसीय यात्रेत ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. कीर्तन, भजन, लावणी, तीन अंकी नाटक, जागरण, कलापथक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या यात्रेच्या निमित्ताने गोंदिया, भंडारा आणि मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील भाविक नवस फेडण्यासाठी या यात्रेत हजेरी लावतात.[]

व्यवस्था

संपादन

भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र नळ योजनेची टाकी, सुलभ शौचालय, कचरा व्यवस्थापन, आदि व्यवस्था करण्यात येतात. यासाठी यात्रा महोत्सवात जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवक नियुक्त केले जातात.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Clipping of Dainik Bhaskar Jabalpur Nagpur Group - गोंदिया". epaper.bhaskarhindi.com. 2023-01-12 रोजी पाहिले.
  2. ^ "Sakal Epaper". epaper.esakal.com. 2023-01-12 रोजी पाहिले.