बदनापूर तालुका
बदनापूर हे जालना जिह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. जालना जिल्हा होण्यापूर्वी हे बदनापूर औरंगाबाद जिह्यातील जालना तालुक्यातील शहर होते . बदनापूर तालुक्यात सोमठाना येथे रेणुका माता मंदिर आहे जे की जिह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील महत्वाचे श्रद्धास्थान आहे . तालुक्यातील दुधना नदी ही प्रमुख नदी असून त्या नदीवरील दुधना मध्यम प्रकल्प ही सोमठाना गडाला लागूनच आहे दुधना नदीवर जवळपास 3 किमी अंतरावर अकोला हे भव्य गावं वसलेले आहे . अकोला येथे भगवान बाबा याचे मोठें भव्य मंदिर आहे आणि वाल्मिक ऋषी यांचे समाधी स्थळ आहे . हे गाव बदनापूर राजूर ह्या रस्त्यावर आहे. बदनापूर हा मुंबई नागपूर राज्य महामार्गावर वसलेले आहे।
?बदनापूर महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ५२३ मी |
विभाग | मराठवाडा |
जिल्हा | जालना |
लोकसंख्या | १,५३,७७२ (2011) |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | जालना |
तहसील | बदनापूर |
पंचायत समिती | बदनापूर |
कोड • पिन कोड • दूरध्वनी |
• 431202 • +०२४८२ |
बदनापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे.
हा तालुका औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे .
पर्यटन स्थळे
संपादनबदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे रेणुका माता देवीचे मंदिर आहे तसेच जवळच सोमठाना धरण आहेजे निसर्ग सौंदर्यनि परिपूर्ण आहे . बदनापूर मध्ये मार्केट कमिटी हे देखील एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. बदनापूर पासून 10 किमी वर असलेले नूर हॉस्पिटल व परिसर हे जवळपासच्या लोकांसाठी मनोरंजाचे ठिकाण बनले आहे .
कसे पोहचाल: रस्ते :-हे ठिकान जालना-औरंगाबाद महामार्गावर वसलेले आहे
रेल्वे :-काचिकुडा-मनमाड रेल्वमार्गावरील बदनापूर हे महत्वाचे स्थानक आहे .
हवाई :- 40 किमी वर चिकलठाणा(औरंगाबाद) हवाईअड्डा आहे.