बटान
बटान हा फिलिपाईन्सच्या लुझोन बेटावरील प्रांत आहे. बटानची राजधानी बलांगा सिटी आहे.
दुसऱ्या महायुद्धात येथे अमेरिकन व फिलिपीनो सैनिकांनी शर्थीची झुंज देउन जपानी सैन्याला रोखून धरले होते. काही कालाने जपानने जादा कुमक मागवुन प्रतिकार मोडुन काढला व हजारो युद्धबंदी पकडले. या युद्धबंद्यांना नीट वागणुक न दिली गेल्यामुळे शेकडो मृत्युमुखी पडले.