बटाटा
बटाटा हे संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे जमिनीखाली येणारे एक पीक आहे. बटाटा हे त्याच्या रोपाचे खोड आहे.
महत्त्व
संपादनबटाट्यापासून विविध उपवासाचे पदार्थ बनविले जातात. तसेच वाळवणीचे पदार्थ बनवतात. बटाटा हे कंदमूळ(तना) आहे.
त्याचे मुख्य प्रकार दोन, एक भाजीचा बटाटा आणि दुसरा चकत्या/काचऱ्या (वेफर्स), कीस, पापड वगैरे ज्याच्यापासून होतात तो बटाटे. ह्या दुसऱ्या प्रकारचे बटाटे महाराष्ट्रातील सातगाव पठारावर होतात. त्या बटाट्यांना तळेगाव बटाटा म्हणतात. पुण्यापासून ६० किलोमीटवरचे सातगाव पठार. सात गावांचे मिळून बनले आहे, म्हणून त्याला सातगाव पठार म्हणतात. इथले 'तळेगाव बटाटे' देशभरात प्रसिद्ध आहे. इथे वातावरण बटाटा पिकासाठी अत्यंत पोषक असल्याने या सातही गावात खरीप हंगामात सुमारे साडेदहा हजार एकरावर बटाटा पीक घेतले जाते. हे बटाटा पीक महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक आहे.
बटाट्याच्या काही अन्य जाती
संपादन- कुफरी चंद्रमुखी - झाड मध्यम उंच, जोमदार वाढीचे बटाटे आकर्षक, मळकट पांढऱ्या रंगाचे असतात. यातील गर मळकट पांढरा व पिठूळ असतो. याचा तयार होण्याचा कालावधी ९० ते १०० दिवस असून हेक्टरी २०० ते २२५ क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते.
- कुफरी ज्योती - याचा कालावधी ९० ते १०० दिवस असून हेक्टरी १७५ ते २०० क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.
- कुफरी सिंदुरी - फुले फिकट जांभळ्या रंगाची असतात. कालावधी ११० ते १२० दिवस असून हेक्टरी २०० ते २२५ क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते. पाने मुरडणाऱ्या रोगास प्रतिबंध करणारे असे हे वाण आहे.
- कुफरी जवाहर - (जे एच २२२)- संकरित वाण. करपा रोग प्रतिबंधक. हेक्टरी बियाण्याचे प्रमाण २० ते २५ क्विंटल व उत्पन्न हेक्टरी २०० ते २२५ क्विंटल.
लागवडीचा हंगाम
संपादनबटाटा हे थंड हवामानातील पीक असून असेच हवामान त्याचे वाढीस पोषक असते. महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगामात याचे अधिक उत्पादन येते. साधारणत: याची लागवड २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या दरम्यान करतात. पुढील थंडीचा काळ याचे वाढीस पोषक असतो.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
काढणी, प्रतवारी व विक्री=
संपादनबटाट्याची पाने सुमारे ९०% सुकल्यावर किंवा पिवळी पडल्यावर, बटाट्याच्या फांद्यांची जमिनीलगत छाटणी करतात. त्यानंतर बटाटे काढून ८-१० दिवस कडुनिंबाच्या पाल्याने अथवा कोरड्या गवताने झाकून त्यांना थंड जागी ठेवतात. मोठे, मध्यम बटाटे वेगळे करून, त्यांतील हिरवे, साल निघालेले, कीडग्रस्त व सडलेले बटाटे काढून टाकतात. चांगल्या बटाट्याची त्वरित विक्री न करता आल्यास ते शीतगृहात ठेवतात.[१]