बंदरपाखाडी
बंदरपाखाडी कोळीवाडा हा मुंबईच्या पश्चिम कांदिवली उपनगरातील निवासी भाग आहे. येथे ख्रिश्चन कोळी आणि हिंदू कोळी समाजाची सुमारे २०० कुटुंबे राहतात. यांतील पुरुष बव्हंशी मच्छिमारी करतात तर स्त्रीया मासळी बाजारात मासे विक्री करतात.
भाग ४०० वर्षाहून अधिक जुना आहे.तेथे पवित्र क्रॉसचे एक खूप जुने चॅपल आहे तसेच तेथे हनुमान मंदिर आहे. येथे बंदरपाखाडी गाव बी.एम.सी. शाळा आहे