फ्रीडरिश एंजेल्स
(फ्रीडरीश एंजेल्स या पानावरून पुनर्निर्देशित)
फ्रीडरीश एंजेल्स (नोव्हेंबर २८, इ.स. १८२० - ऑगस्ट ५, इ.स. १८९५) हा जर्मन समाजशास्त्रज्ञ, लेखक आणि तत्त्वज्ञ होता. याला कार्ल मार्क्सच्या बरोबरीने मार्क्सवादाचा जनक मानले जाते. याने १८४५मध्ये इंग्लंडमधील कष्टकऱ्यांची स्थिती हा ग्रंथ लिहिला तर १८४८ मध्ये याने कार्ल मार्क्स बरोबर संयुक्तपणे समाजवादाचा जाहिरनामा ही प्रसिद्ध पुस्तिका १८४८ साली प्रकाशित केली. त्यानंतर एंजेल्सने मार्क्सला दास कापिताल हा ग्रंथ लिहिण्यास आर्थिक मदत केली.