फुकुशिमा (अन्य लेखनभेद: फुकुशिमा-शी ; जपानी: 福島市 ; रोमन लिपी: Fukushima ;) हे तोहोकू प्रदेशातील फुकुशिमा विभागाचे राजधानीचे शहर आहे. हे तोक्योच्या उत्तरेस ३०० कि.मी., तर सेंदाईच्या दक्षिणेस ८० कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स. २००३ सालातील सांख्यिकीनुसार ७४६.४३ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाच्या या शहराची लोकसंख्या २,९०,८६६ होती, तर लोकसंख्येची घनता ३८९.६८ होती.

फुकुशिमा शहराचे दृश्य

फुकुशिमा भागातच फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प आहे. इ.स. २०११ साली भूकंपामुळे आलेल्या त्सुनामी लाटेने येथील अणुऊर्जा प्रकल्पाची मोठी हानी केली. त्यातच येथील अणुभट्टीचा स्फोट होऊन किरणोत्सर्ग झाला होता.

बाह्य दुवे

संपादन