फिरोज दस्तूर

भारतीय शास्त्रीय संगीत गायक (१९१९-२००८)
फिरोज दस्तूर
आयुष्य
मृत्यू ९ मे, २००७
मृत्यू स्थान मुंबई
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
संगीत साधना
गुरू सवाई गंधर्व
घराणे किराणा
संगीत कारकीर्द
पेशा गायक

पंडित फिरोज दस्तूर (?? - मे ९, २००८, मुंबई) हे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. त्यांनी सवाईगंधर्वांकडून संगीताचे शिक्षण घेतले.

सांगीतिक कारकीर्द

इ.स. १९३० च्या दरम्यान दस्तूर भारतीय चित्रपट सृष्टीत अभिनेते म्हणून काम करत होते. त्यांनी काही काळ वाडिया मूव्हीटोन आणि इतर चित्रपट संस्थांबरोबर काम केले. परंतु शास्त्रीय संगीताकडे त्यांची ओढ सर्वाधिक होती.

सवाई गंधर्व संगीत महोत्सवात ते नियमित हजेरी लावत व उपस्थितांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करत असत. आयुष्याच्या अखेरच्या वर्षांपर्यंत त्यांनी हा नेम कायम ठेवला.

मृत्यू

मे २००८ मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी मुंबई येथे अल्प आजारानंतर दस्तूर यांचे देहावसान झाले.

बाह्य दुवे

संपादन