फलकनुमा पॅलेस हॉटेल

(फलाकनुमा पॅलेस या पानावरून पुनर्निर्देशित)

फलकनुमा पॅलेस हॉटेल भारतामध्ये आंध्र प्रदेशामधील हैदराबाद येथील हॉटेल आहे.

फलकनुमा पॅलेस संपादन

या हॉटेलची मालकी निझामाकडे आहे.[१] चारमिनारपासून ५ कि.मी. अंतरावर ३२ एकर जागेवर हे हॉटेल बांधलेले आहे. हैदराबादचे प्रंतप्रधान नवाब विकार-उल-उमरा, पाचव्या निजामाचे काका आणि जावई - नवाब मिर महबूब अली खान बहादूर यांनी हे हॉटेल बांधलेले आहे .[२] उर्दू मध्ये ‘फलकनुमा’ म्हणजे ‘आकाशासारखे स्वच्छ’ किंवा ‘आकाशाचा आरसा’.[ संदर्भ हवा ]

नक्षीकाम संपादन

एका इंग्रजी वास्तुशास्त्रज्ञाने या राजमहालाचा आराखडा तयार केला. सर विकार यांनी ३ मार्च, १८८४ रोजी बांधकामाला सुरुवात केली. हा राजमहाल पूर्ण बांधण्यास ९ वर्षाचा कालावधी लागला. डिसेंबर १९८९ मध्ये सर विकार राजमहालाच्या गोल बंगला आणि जनाना महाल येथे रहाण्यासाठी गेले आणि त्यानंतर त्यांनी तेथून मर्दाना येथे चालू असलेल्या कामावर देखरेख करण्यास सुरुवात केली. ९३,९७१ चौ. मीटर जागेवार इटालियन संगमरवराच्या सहाय्याने हे काम पूर्ण केले गेले.

दोन नांगी असलेल्या विंचूच्या आकारानुसार याचे बांधकाम केलेले आहे. प्रदर्शनीय भागामध्ये मुख्य इमारत असून खादयगृह , गोल बंगला , जनाना महाल आणि इतर कक्ष दक्षिणेस बांधलेल्या आहेत. नवाब हा चोखंदळ प्रवासी असल्याचे या बांधकामावरून लक्षात येते.

फलकनुमा राजमहाल बघताना इटालियन आणि ट्रुडोन वास्तूशास्त्राचा संगम झालेला दिसतो. काचेच्या खिडकयांच्या सहाय्याने येथील कक्षामध्ये रंगबिरेंगी प्रकाशाची रचना केलेली आहे.

इतिहास संपादन

 
फलाकनुमा पॅलेस १९००मध्ये

सर विकार यांचे खाजगी निवासस्थान म्हणून या राजमहालाचा प्रथम वापर होत होता. १८९७-१८९८ च्या जवळपास याचे हस्तांतरण हैद्राबादच्या ६ व्या निजामाकडे करण्यात आले. या राजमहाल बांधण्यावर अतिशय खर्च झाला असून सर विकार उल यांना सुद्धा बांधकाम करतांना कर्जाने रक्कम घ्यावी लागली होती. त्यावेळी त्याची हुशार बायको, विकार उल उमरा यांनी मेहबूब अली पाशा सहावा निजाम याला हा राजमहाल बघण्यास आमंत्रित करण्याची एक युक्ती सुचवली. सहाव्या निजामाला हा राजमहाल अतिशय आवडला व त्याने या राजमहालासाठी झालेला सर्व खर्च सर विकार उल यांना देउुन त्याच्या बदल्यात या राजमहालाचा मालकी हक्क मिळविला.तेव्हापासून या राजमहालाचा ताबा सहाव्या निजामाकडे आला व या महालाचे रूपांतर अभ्यागतांच्या निवासस्थानामध्ये करण्यात आले.

निजामाची सत्ता संपल्यानंतर १९५० च्या सुमाराम येथे शांतता पसरली. भारताचे राष्ट्रपती, डॉ. राजेन्द्र प्रसाद हे १९५१ मध्ये आलेले शेवटचे अभ्यागत ठरले. त्यानंतर ब-याच कालावधीसाठी हा राजमहाल बंद होता. २००० मध्ये निजामाचे सुपूत्र मुक्करम जाह बहादूर शाहीद यांनी हा राजमहाल ताज हॉटेलच्या मालकाला टाटा समूहाला भाडे करार तत्त्वावर दिला. त्यानुसार नप्फयातील ५० टक्के हिस्सा किंवा किमान रु. २५ लक्ष यापैकी जी जास्त असलेली रक्कम दरमहा निजामाला देण्याचे ठरले.

या राजमहालाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी पुनर्रचना करण्याची जबाबदारी ७ व्या निजामाच्या पत्नीकडे, महाराणी आसरा जहॉं हिच्याकडे सोपविण्यात आली.

पनर्रचना करताना फलाकनुमा राजमहालाचे वैभव पुन्हा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. निजामकाळातील वास्तुशास्त्र, बराक पद्धती, फ्रेंच कलाकुसर, कलात्मक सौंदर्य, आणि पॅलेसमधील इतर नक्षीकाम पुन्हा नव्याने उभारणे हे अतिशय मेहनतीचे आणि किचकट काम होते.

राजमहाल संपादन

या राजमहालातील चौकशी कक्षाच्या छपरावर ओल्या गिलाव्यावर चित्रे काढण्याची कला केलेली असून त्याला सोन्याचा मुलामा देउुन सजवलेले आहे. या राजमहालाला कोरीव नक्षीकाम केलेले २२० कक्ष असून २२ विशाल सभागृह आहेत. निझामाच्या ताब्यातील बहुमोल संपत्तीचा खजिना या महालामध्ये आहे. जगामध्ये कुठेही न आढळणारी अशी दुर्मिळ चित्रे, पुतळे, फर्निचर , हस्तलिखिते आणि वेगवेगळी पुस्तके यांचा संग्रह या महालामध्ये आहे..[३]

याशिवाय बिलियर्ड रुम, भारतामधील दुर्मिळ कुराणांचा संग्रह असलेले संग्रहालय, भारतामधील सर्वांत मोठे इलेक्ट्रीकल स्विचबोर्ड इ.वैशिष्टये या राजमहालाची आहेत.[४]

ऐषआरामी हॉटेलची पुनर्रचना संपादन

२००० मध्ये ताज हॉटेलने या राजमहालाची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली.[५] नोव्हेंबर २०१० मध्ये ते सर्वांसाठी खुले झाले.[६] १०१ जणांना एकाच वेळी बसता येईल असा जगात सर्वांत मोठा डायनिंग हॉल, दरबार हॉल, उत्कृष्ट प्रतीच्या लाकडावर केलेले कोरीव काम, संगमरवरी जमीन, सुबक फर्निचर इ. वैशिष्टये या हॉटेलची आहेत.[७]

संदर्भ संपादन

  1. ^ "बिझनेस स्टॅण्डर्ड 'राज्यातील घडामोडी'" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "फलाकनुमा पॅलेस". Archived from the original on 2013-11-05. 2014-03-18 रोजी पाहिले.
  3. ^ "ताज फलाकनुमा पॅलेसविषयी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "ताज फलाकनुमा पॅलेसचा आढावा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "रतन टाटांची ७ नोंव्हेंबर ला के रोशेशी भेट- डीएनए" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ शॅरेल, कूक. "हैद्राबादच्या फलाकनुमा पॅलेसचे ऐषआरामी हॉटेलमध्ये रुपांतर" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-11-05. 2014-03-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "द ट्रीब्युन, चंदीगढ, इंडिया – मुख्य बातमी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)