फकिरा

आण्णा भाऊ साठे
(फकिरा (कादंबरी) या पानावरून पुनर्निर्देशित)

फकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. या कांदबरीत फकिरा नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकिरा आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्ट्या उत्तम अशी ही कादंबरी आहे.

अण्ण भाऊ साठे यांच्या इतर कादंबऱ्यांप्रमाणेच, संघर्ष हा फकिरा या कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे. या कादंबरीला वि.स. खांडेकरांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात, अण्णा भाऊंना प्रतिभेचे देणे आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हर तऱ्हेच्या गोष्टींचा अनुभव त्यांना आहे. त्यांच्या मनात एक प्रकारचा पीळ आहे आणि शोषणाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा तो पूजक आहे.

फकीरा ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे .ग्रामीण, प्रादेशिक, दलित ,ऐतिहासिक कादंबरी म्हणून जशी ती महत्त्वाची आहे तशी ती एक उपेक्षित नायकाचे बंडखोर जीवन समाजासमोर आणणारी कादंबरी म्हणूनही महत्त्वाची आहे.फकीरा ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे .ग्रामीण, प्रादेशिक, दलित ,ऐतिहासिक कादंबरी म्हणून जशी ती महत्त्वाची आहे तशी ती एक उपेक्षित नायकाचे बंडखोर जीवन समाजासमोर आणणारी कादंबरी म्हणूनही महत्त्वाची आहे.फकिराचे बंड सामाजिक न्यायाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत असल्यामुळे त्याचे जगणे त्याचा संघर्ष हा व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास ठरणार आहे .अण्णाभाऊंच्या या फकीरा कादंबरी मध्ये नैतिकतेचे वेगळेच अधिष्ठान आपल्याला पाहायला मिळते.उदाहरणार्थ -गावात दुष्काळ पडतो. भूकेने माणसं मरायला लागतात. तेव्हा धान्य मागण्यासाठी फकीरा विष्णूपंतांच्या वाड्यावर जातो.तेव्हा

विष्णुपंत कुलकर्णी म्हणतात ,”कोण कोणाचा धनी नाही. पंत बोलून गेले. माझ्याभोवती आक्रोश सुरू झाला आहे. मी संकटात आहे. परंतु माझे स्पष्ट मत हे आहे की, तुम्ही जगलंच पाहीजे. मरणापेक्षा आज जगणं खूप महत्त्वाच आहे.” यावरून विष्णुपंत कुलकर्णी यांचा मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो ....माझ्याभोवती आक्रोश आहे. मी संकटात आहे .हा त्यांचा प्रामाणिकपणा.

एवढे दुष्काळाचे सावट असतानाही माणसं जगली पाहिजेत. हे माणसा बद्दलचे अपार प्रेम ,आपल्या लक्षात येते.  संवेदनशील पणा आणि करुणा या मूल्यांचा आविष्कार होतो.विष्णुपंत कुलकर्णी यांच्या ठिकाणी असलेली संवेदनशीलता लोकांविषयी चा जिव्हाळा ,प्रेम, सहानुभूती, मानवतावादी दृष्टीकोण फकीरा विषयीची करूण, त्याच्या पराक्रमाची ,स्वाभिमानाची आणि संघटित पणाची जाणीव ,निर्भयपणे विष्णुपंत कुलकर्णी  करून देतात.

संदर्भसंपादन करा