डॉ. पद्माकर विष्णू वर्तक (जन्म : २५ फेब्रुवारी, १९३३; निधन : पुणे, २९ मार्च २०१९) हे व्यवसायाने डॉक्टर. वर्तक कुटुंबाचा तपकीर बनवण्याचा पिढीजात व्यवसाय होता. मात्र व्यवसायात स्वतःला झोकून न देता वर्तक यांनी पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एम. बी. बी. एस.ची पदवी संपादन केली. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या विषयामध्ये एम.डी. केल्यावर त्यांनी शल्यचिकित्सा विषयाचा अभ्यास केला. ससून रुग्णालय, टिळक आयुर्वेद महाविद्यालय आणि शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल येथे शल्यविशारद म्हणून त्यांनी काम केले. सन १९५९ मध्ये त्यांनी स्वतःचे विष्णूप्रसाद नर्सिंग होम सुरू केले. मात्रा काही काळ वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर डॉ. प. वि. वर्तक यांनी रामायण आणि महाभारताचे संशोधन हेच कार्यक्षेत्र निवडले. ऋग्वेद, महाभारत आदी ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी रामायणाचा काळ ठरवला. रामामध्येही दोष होते असे मत त्यांनी मांडले. संशोधनात्मक अभ्यासातून त्यांनी ’वास्तव रामायण’ हा ग्रंथ लिहिला. त्यांचा ’महाभारता’वर आधारित ’स्वयंभू हा ग्रंथही प्रसिद्ध आहे.

असे म्हणतात की सूक्ष्म देहाने मंगळावर व गुरूवर जाऊन त्यांनी तेथील माहिती अवकाशयानांनी मिळविण्याची आधीच प्रसिद्ध केली[].[ संदर्भ हवा ]

शिक्षण आणि व्यवसाय

संपादन

प.वि. वर्तक १९४९ साली ते विशेष प्रावीण्यासह मॅट्रिक झाले. त्यांनी संस्कृतच्या तीन परीक्षा दिल्या होत्या. चित्रकलेच्या इंटरमिजिएट परीक्षेत ते मुंबई इलाख्यात पहिले आले होते. लंडन चेंबर ऑफ कॉमर्स या परीक्षेत, तसेच शरीरसौष्ठव स्पर्धेतसुद्धा त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. १९५६ साली ते पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. झाले. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये त्यांना डिस्टिंक्शन मिळाले. पुढे त्यांनी सर्जरीचा अभ्यास केला. ससून हॉस्पिटल, लोकमान्य टिळक आयुर्वेद विद्यालय व शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल येथे सर्जन म्हणून त्यांनी काम केले. १९५९ मध्ये त्यांनी स्वतःचे विष्णूप्रसाद नर्सिग होम सुरू केले.

संशोधन आणि संस्था स्थापना

संपादन

वर्तकांनी १९५६ पासून अध्यात्म व योग यांचा अभ्यास सुरू केला. प्राचीन भारतीय शास्त्रे, महाभारत, रामायण, वेद, उपनिषदे यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला व पातंजल योगाचे अनुशासन आरंभिले. १९७५ मध्ये त्यांनी योग व अध्यात्म यांच्या संशोधनासाठी ‘अध्यात्म संशोधन मंदिर’ स्थापन केले. पुढे १९७६ मध्ये प्राचीन भारतीय विज्ञानाचा शोध घेण्यासाठी वर्तकांनी ‘वेद विज्ञान मंडळ’ स्थापन केले.

प.वि. वर्तकांचे आध्यात्मिक आणि विज्ञाननिष्ठ प्रयोग

संपादन

१. १० ऑगस्ट १९७५ या दिवशी त्यांनी ध्यानधारणा करून मंगळ भ्रमणाचा प्रयोग केला. हा प्रयोग २१ मे १९७६ च्या ‘संतकृपा’ व १ जून १९७६ च्या ‘धार्मिक’ या मासिकांतून प्रसिद्ध केला.
२. वर्तकांनी ध्यानांतून दुसरी मंगळ यात्रा १२ ऑगस्ट १९७६ रोजी केली. मंगळ ग्रहाच्या माहितीचा, तोपर्यंत अज्ञात असलेला, तपशील २२ ऑगस्ट १९७६ च्या ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये एकूण २१ मुद्दे प्रसिद्ध केले होते. पुढे एक वर्षांने ‘नासा’ने यानांकडून मिळालेली मंगळ ग्रहाची माहिती प्रसिद्ध केली. डॉ. वर्तकांनी प्रसिद्ध केलेल्या २१ मुद्यांपैकी २० मुद्दे नासाच्या माहितीशी जुळले. २१ वा मुद्दा पुढे ११ वर्षांनी, म्हणजे १९८७ साली ‘नासा’च्या परीक्षणाप्रमाणे खरा ठरला.
३. ऑगस्ट १९७६ मध्ये डॉ. वर्तकांनी ध्यानातून गुरूभ्रमणाचा प्रयोग केला व एकूण २० नोंदी त्यांनी मासिकात व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केल्या. यापैकी नऊ मुद्दे नंतर ‘नासा’ने केलेल्या परीक्षणामध्ये बरोबर आले. १० वा मुद्दा जुळण्यासारखा आहे. इतर १० मुद्दे ‘नासा’च्या परीक्षणामध्ये नव्हते व अजून शास्त्रज्ञांनी ते विचारात घेतलेले नाहीत. पुढे कधीतरी हे मुद्देही सिद्ध होतील, अशी वर्तकांना आशा होती.
४. ध्यानधारणेच्या मार्गाने ज्ञात झालेली शनी ग्रहाची माहिती वर्तकांनी त्यांच्या आत्मचरित्रात प्रसिद्ध केली आहे. शनीभोवतीच्या कड्यांमध्ये तरंगणारे खडक असल्याचे त्यांनी सांगितले. तेही नंतर खरे ठरले आहे. आणखी विशेष गोष्ट म्हणजे दुसऱ्या सूर्यमालेतील मानवाच्या अस्तित्वाचा उल्लेख करून तेथील मानवाचे वर्णनही त्यांनी करून ठेवलेले आहे. आधुनिक विज्ञान याबद्दल आजही अनभिज्ञ आहे.

प.वि. वर्तकांच्या मते रामायण-महाभारताचा काळ

संपादन

डॉ. वर्तक यांच्या संशोधनाननुसार १६ ऑक्टोबर (इ.स.पू) ५५६१ या दिवशी रविवारी महाभारताचे युद्ध झाले. त्या दिवशी सूर्यग्रहण होते. सूर्य द्विधा झाला अ्रसे व्यासांनी म्हणले आहे. ग्रहणामध्ये काळी तबकडी आणि भोवती प्रभामंडळ असे दोन भाग दिसतात. त्यावेळी सूर्याने ज्वाळा बाहेर फेकण्याचे कार्य केले हे व्यासांचे सांगणेसुद्धा विज्ञानाने मानले आहे ‘व्हॉएजर सॉफ्टवेर वापरून अमेरिकेतील निलेश ओक यांनी वर्तकांनी शोधून काढलेल्या तारखा अचूक असल्याचे निष्कर्ष सिद्ध केले आहेत, असे म्हणतात. व्यासांनी अरुंधतीचा तारा वसिष्ठाच्या पुढे गेला असा जो उल्लेख केला आहे यावरून संपूर्ण महाभारताचा कालखंड निश्चितपणे शोधून काढता येईल, हे विधान डॉ. वर्तक यांनी १९७१ साली केले होते.

डॉ. प.वि. वर्तक यांची ‘वर्तक प्रकाशन’ नावाची एक पुस्तक प्रकाशन संस्था होती. ही संस्था वर्तकांची पुस्तके प्रकाशित करी. या पुस्तकांशिवाय त्या संस्थेने प्रकाशित केलेली काही पुस्तके :-

डॉ. प.वि. वर्तक यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • A Realistic Approach To The Valmiki Ramayana
  • A scientific Interpretation of Ishvasya Upanishad
  • A Scientific Interpretation Of Kathopanishad
  • A scientific Interpretation of Prashnopanishad
  • Bajirao The Great
  • Dazzling Draupadi
  • Essays On Vedic Culture And Literature ( Felicitation Volume)
  • Freedom Fighter V. D. Savarkar
  • The Geeta
  • The Gleams Of Science In The Upanisads And Srimad Bhagwat Gita
  • Hanuman, The Valiant; Not a Slave!
  • Karma & Brahmadharya
  • Rebirth
  • The Scientific Dating Of The Mahabharata War
  • The Scientific Dating Of The Ramayana & The Vedas
  • Shri Krishna, The Epoch Maker
  • Sui Generis Bheema
  • Veda - The Root Of Science
  • Veer Savarkar
  • उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरूपण - भाग १ आणि २
  • गीता - विज्ञाननिष्ठनिरूपण
  • तेजस्विनी द्रौपदी
  • संगीत दमयंती परित्याग (नाटक)
  • दास मारुति? नही, वीर हनुमान् ! (हिंदी)
  • दास मारुती? नव्हे, वीर हनुमान ! (मराठी)
  • पहिले आणि एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर
  • ||पातंजल योग ||
  • पुनर्जन्म (मराठी)
  • पुनर्जन्म (हिंदी)
  • प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे
  • ||ब्रह्मर्षींची स्मरण यात्रा|| (आत्मकथन)
  • मत्स्यपालन
  • युगपुरुष श्रीकृष्ण
  • वास्तव रामायण
  • वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय
  • स्वयंभू
  • स्वातंत्र्यवीर सावरकर चावट की वात्रट ?
  • स्वातंत्र्यवीर सावरकर - मूर्तिमंत गीता


डॉ. प.वि. वर्तक यांना मिळालेले सन्मान

संपादन
  • लोकांनी त्यांना १९९३ मध्ये ‘ब्रह्मर्षी’ व १९९६ मध्ये ‘समाजभूषण’ आणि शिवाय श्रद्धानंद, ज्ञानसूर्य, प्रज्ञानब्रह्म, आणि हिंदुत्वभूषण अशा पदव्या बहाल केल्या.

संदर्भ

संपादन
  1. ^ "ASTRAL TRAVEL TO MARS (part-1) By. Dr.PV Vartak". www.speakingtree.in. 2019-10-06 रोजी पाहिले.