सान लुइस पोतोसीचा आराखडा
(प्लान दि सान लुइस पोतोसी या पानावरून पुनर्निर्देशित)
सान लुइस पोतोसीचा आराखडा हा मेक्सिकोच्या फ्रांसिस्को मदेरोने लिहिलेला दस्तावेज आहे. १९१० च्या राष्ट्राध्यक्षीय उमेदवार असलेल्या मदेरोला मेक्सिकोच्या सरकारने घातलेल्या घातले होते. तुरुंगातून पळून जाउन त्याने हा आराखडा लिहिला होता. यात त्याने मेक्सिकोच्या जनतेला १९१० च्या निवडणुका रद्दबातल करण्याचे व २० नोव्हेंबर, १९१० रोजी सरकारविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले होते.
१८ नोव्हेंबरला झालेल्या चकमकीनंतर २० नोव्हेंबरला मेक्सिकन क्रांतीला सुरुवात झाली आणि त्याची परिणती तत्कालीन राष्ट्राध्यक्ष पोर्फोरियो दियाझने मे १९११मध्ये दिलेल्या राजीनाम्यात झाली.