प्रोखोरोव्ह्का
प्रोखोरोव्ह्का रशियाच्या बेल्गोरोद ओब्लास्तमधील छोटे शहर आहे. कुर्स्कच्या नैऋत्येस असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ९,७६१ होती, जी २००२ च्या जनगणनेपेक्षा कमी होती.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४३ च्या उन्हाळ्यात कुर्स्कच्या लढाई अंतर्गत येथे मोठी लढाई झाली होती. यात सोव्हिएत संघाचे ५,५०० तर जर्मनीचे ८४२ सैनिक ठार झाले.