प्रेम सिंह तमांग

सिक्कीमचे सहावे मुख्यमंत्री

प्रेम सिंह तमांग ( ५ फेब्रुवारी १९६८) हे भारत देशाच्या सिक्किम राज्याचे विद्य्मान मुख्यमंत्री आहेत. १९९४ सालापासून सिक्कीमच्या राजकारणामध्ये सक्रीय असणारे तमांग सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्षाचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष आहेत. २०१३ साली हा नवा पक्ष स्थापन करण्यापूर्वी ते सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट ह्या पक्षाचे वरिष्ठ नेते होते.

प्रेम सिंह तमांग

विद्यमान
पदग्रहण
२७ मे २०१९
राज्यपाल गंगा प्रसाद
मागील पवनकुमार चामलिंग

जन्म ५ फेब्रुवारी, १९६८ (1968-02-05) (वय: ५६)
पश्चिम सिक्किम जिल्हा,भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा

२०१९ मधील सिक्कीम विधानसभा निवडणुकीमध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने ३२ पैकी १७ जागांवर विजय मिळवून बहुमत नक्की केले. मुख्यमंत्रीपदावरील पवनकुमार चामलिंग ह्यांच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीनंतर तमांग सिक्कीमचे सहावे मुख्यमंत्री बनले.

बाह्य दुवे

संपादन