प्रीतिसंगम (नाटक)
हा लेख प्रीतिसंगम नावाचे मराठी भाषेतील नाटक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, प्रीतिसंगम (निःसंदिग्धीकरण).
प्रीतिसंगम हे मराठी भाषेतील आचार्य अत्रे यांनी लिहिलेले आणि गाजलेले संगीत नाटक आहे. हे नाटक संत सखूच्या जीवनावर आधारले आहे. विश्वनाथ बागुल, ज्योत्स्ना मोहिले आणि उदयराज गोडबोले यांनी या नाटकाच्या पहिल्या प्रयोगांत भूमिका केल्या होत्या. वसंत देसायांनी या नाटकातील गाण्यांना चाली दिल्या होत्या.
हे नाटक पुढे प्रशांत दामले, क्षमा वैद्य व मोहन जोशी यांनीही केले.
प्रीतिसंगममधील नाट्यगीते
संपादन- आज आपुल्या प्रथम प्रीतिचा
- किती पांडुरंगा वाहू
- कृष्ण माझी माता
- तू सुंदर चाफेकळी
- देह देवाचे मंदिर