प्रिय रंजन दासमुन्शी

भारतीय राजकारणी

प्रिय रंजन दासमुन्शी (नोव्हेंबर १३, इ.स. १९४५ - २० नोव्हेंबर, २०१७:नवी दिल्ली, भारत) हे कॉंग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९७१, इ.स. १९८४, इ.स. १९९६, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्यातील रायगंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते मनमोहन सिंह यांच्या मंत्रीमंडळात माहिती आणि प्रसारणमंत्री, संसदीय कार्यमंत्री आणि जलस्त्रोत विकासमंत्री होते.