प्रिंटर

(प्रिंटर(संगणक) या पानावरून पुनर्निर्देशित)

संगणक वरून माहिती छापून घेण्यासाठी प्रिंटर या आउटपुट डिवाइस वापर केला जातो. संगणकाने प्रिंट कमांड दिली कि तो आपोआप जशीतशी माहिती कागदावर छापतो. संगणका मधून अशी माहिती प्रिंटर या प्रदान म्हणजेच आउटपुट डिवाइस मधून कागदावर छापता येते. प्रिंटर ने छापलेली माहिती तशीच राहते म्हणुन त्या माहितीला हार्ड कॉपी असे म्हणतात. प्रिंटर हे परेलाल किवा यूएसबी केबल द्वारे CPU मध्ये मदरबोर्डला जोडले जाते. प्रिंटरचे सध्या ३ भाग प्रचलित आहेत.

Printer

डॉट मेट्रिक्स प्रिंटर

संपादन

संगणकाच्या संदेशा प्रमाने पिन्स रिबिन वर जलद गतीने आघात करतात त्या मुळे कागदावर टीबाच्या स्वरूपात अक्षरे उमटतात. पण प्रिंटिंगच्या वेळी खुप मोठा आवाज करत प्रिंटिंग करतात. बँकेच्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रिंटर वापरले जातात

इंक जेट प्रिंटर

संपादन

इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्रांच्या नॉझल्सने कागदावर उडवले जातात. यात नोझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात चार प्राथमिक रंग मिसळुन रंगित प्रिंट करता येते.

लेझर प्रिंटर

संपादन

हा प्रिंटर छपाईसाठी लेझर किरणांचा वापर करतो.. संगणकाकडून येणाऱ्या माहितीनुसार लेझर किरण सतत गोल फिरणाऱ्या ड्रमवर पडतात. या लेझर किरणांमुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे ठिपके तयार होतात. ड्रमच्या लगत असलेली कोरड्या शाईची भुकटी (टोनर) ड्रमवरील विद्युत् प्रभारित कागदावर मजकुराच्या ओळी किवा चित्राचे भाग तयार करते..

झेराॅक्स, स्कॅनर, प्रिंटर, फॅक्स अशा सर्व गोष्टी एकात मिळणाऱ्या ऑल इन वन (All In One ) प्रिंटरला सध्या जास्त मागणी आहे.

 
All In One Printer

चित्रदालन

संपादन