प्रहार क्षेपणास्त्र

(प्रहार या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रहार हे भारत विकसित करीत असलेले लघुपल्ल्याचे सत्त्वर प्रतिकारक क्षेपणास्त्र. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) प्रहारचे आरेखन आणि विकास करीत आहे. त्याचा पल्ला १५० किलोमीटरपर्यंत आहे. रस्त्यावरील वाहनातील रॉकेट लॉंचर द्वारेही ते डागता येईल. ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यात त्याची पहिली चाचणी दि. २१ जुलै, इ.स. २०११ रोजी घेण्यात आली असून ती यशस्वी झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.[] हे जमिनीवरून हवेत हल्ला करणारे क्षेपणास्त्र आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ [१]बातमी