प्रभू श्रीराम शिल्प तपोवन (नाशिक)

भगवान श्रीरामाची महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती नाशिक जिल्ह्यातील तपोवन येथे असून ती ७० फूट उंच आहे.[] या शिल्पाचा अनावरण सोहळा इस्कॉनचे गौरांग प्रभुजी आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते १२ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाला. नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार राहुल उत्तमराव ढिकले यांच्या संकल्पनेतून ही भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.[]

प्रभू श्रीराम शिल्प तपोवन, नाशिक
सर्वसाधारण माहिती
वर्गीकरण शिल्प
ठिकाण रामसृष्टी उद्यान, तपोवन पंचवटी, नाशिक
उद्घाटन १२ ऑक्टोबर २०२४
उंची ७० फूट


नियोजन

संपादन

नाशिकच्या भूमीला प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचा पदस्पर्श लागला असल्याचे म्हटले जाते. नाशिक महानगरपालीकेने तपोवनामध्ये ५ एकर जागेत भव्य रामसृष्टी उद्यान निर्माण केलं आहे. तपोवन पंचवटी या भागात रामसृष्टीमध्ये प्रभू श्रीरामाचे देखणे शिल्प उभारण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विकास मंत्रालयाने या शिल्पासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.[] १० फेब्रुवारी २०२४ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शिल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता.

नाशिक पुर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांनी तपोवनात प्रभु श्रीरामांचे भव्य  शिल्प उभारण्याची संकल्पना मांडली. ११ ऑक्टोंबर २०२२ रोजी  राज्य सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडे प्रस्ताव हा सादर केला. आमदार राहुल ढिकले यांनी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर तपोवनातील रामसृष्टी उद्यानात जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला.[] सदरील जागेची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर ७० फुटी भव्य शिल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.[]

मूर्तीचे वर्णन

संपादन

प्रभू श्रीरामाचे हे शिल्प फायबर रेनफोर्ज्ड पॉलिमरपासून बनवले असून  श्रीरामांच्या मूर्तीच्या  मागे १०८ फूट उंच भगवा धर्मध्वज आहे.[] तपोवन पंचवटी येथील रामसृष्टी उद्यानात १२ ऑक्टोबर २०२४ रोजी विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या शिल्पाचे अनावरण करण्यात आले. रामसृष्टीत नवीन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कारंजे आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ माझा, मुकुल कुलकर्णी, एबीपी (2024-10-11). "नाशकात उभारली प्रभू श्रीरामाची 70 फुटी मूर्ती, पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारे PHOTOS". marathi.abplive.com. 2024-10-24 रोजी पाहिले.
  2. ^ वृत्तसेवा, पुढारी (2024-10-12). "Nashik Rambhumi | रामसृष्टीत साकारलेल्या ७० फूटी श्रीराम शिल्पाचा भव्य लोकार्पण सोहळा". Pudhari News. 2024-10-24 रोजी पाहिले.
  3. ^ author/chitra (2024-10-11). "Nashik: 70-Foot Statue of Lord Shriram to be Unveiled at Ramshrishti Udyan in Tapovan - www.lokmattimes.com". Lokmat Times (इंग्रजी भाषेत). 2024-10-24 रोजी पाहिले.
  4. ^ वृत्तसेवा, सकाळ (2023-03-11). "BJP News: नाशिकमध्ये भाजपचे 'जय श्रीराम'! पंचवटीच्या रामसृष्टीत 61 फुटी प्रभू श्रीराम शिल्प साकारणार". Marathi News Esakal. 2024-10-24 रोजी पाहिले.
  5. ^ "Lord Ram Idol in Nashik: तपोवन में भगवान राम की 70 फीट ऊंची प्रतिमा का अनावरण, फाइबर पॉलीमर से बनाई गई मूर्ति - Lord Ram Idol in Nashik 70 feet high statue of Lord Ram unveiled in Tapovan statue made from fiber polymer". Jagran (हिंदी भाषेत). 2024-10-24 रोजी पाहिले.
  6. ^ "Maharashtra: नासिक में भगवान राम की 70 फुट ऊंची मूर्ति का अनावरण; TATR के मोहरली में रतन टाटा के नाम पर सेंटर". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2024-10-24 रोजी पाहिले.
  7. ^ "महाराष्ट्रात प्रभू श्रीरामाची तब्बल 71 फूट उंची भव्य मूर्ती; तपोवनामध्ये रामसृष्टी". Zee 24 taas. 2024-10-11. 2024-10-24 रोजी पाहिले.