प्रभा सोनवणे
प्रभा सोनवणे या लेखिका, कवयित्री, संपादक असून अनेक काव्यसंस्थांवर त्यांनी पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९५६ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. जन्म स्थळ- वाडा जिल्हा पालघर.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
शिक्षण- एम.ए.(मराठी)- पुणे विद्यापीठ.
शालेय जीवनापासूनच कविता कथा लेखनास सुरुवात. विद्याधाम प्रशाला- शिरूर येथे इयत्ता आठवीत असताना हस्तलिखितासाठी पहिली कथा व कविता लिहिली.
१९७५ पासून विविध साप्ताहिकातून ,मासिकातून, दिवाळी अंकांमधून सातत्याने कथा /कविता प्रकाशित.
महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अन्य कवयित्री सह कवितेच्या प्रचार व प्रसारासाठी स्वरचित काव्य सादरीकरणाचे अनेक कार्यक्रम केले.
*प्रकाशित पुस्तके*
१ अनिकेत
२ जाईजुई
३ मृगचांदणी
(हे कविता संग्रह)
४ मैत्रपंचमी
(आत्मकथन)- प्रातिनिधिक
५ ती..ती...आणि ती
(पुरस्कार प्राप्त कवितेच्या कार्यक्रमाचे पुस्तक रूपांतर)-प्रातिनिधिक
६ स्नेहसावली या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे संपादन
अभिमानश्री हा दिवाळी अंक काही वर्षे प्रकाशित केला.
*पुरस्कार*
१ कवी कालिदास
२ राष्ट्रगौरव
३ मदर तेरेसा साहित्य पुरस्कार
४ कवी केशवकुमार
५ लळित साहित्य (मृगचांदणीला)
७ बंधुता प्रतिष्ठान साहित्य गौरव
८ साहित्य गौरव
९ गझलगौरव
१०काव्यदीप (साहित्यदीप संस्था)
११शिवांजली साहित्य गौरव
१२प्रियदर्शनी इंदिरा (लेखिका पुरस्कार)