प्रभाकर नारायण परांजपे
प्रा. प्रभाकर नारायण परांजपे हे पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख होते. त्यांनी शुद्धलेखन, मराठी प्रतिशब्द निर्मिती व त्यांचा उपयोग या क्षेत्रात काम केले आहे. ते मराठी अभ्यास परिषद संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य आहेत. मराठी अभ्यास परिषदेतर्फे प्रकाशित होणाऱ्या भाषा आणि जीवन ह्या त्रैमासिकाचे ते प्रमुख संपादक आहेत. त्यांची अनुवाद, कथालेखन आणि संपादनपर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. 'कविता दशकाची', 'कविता विसाव्या शतकाची' ह्या संपादित प्रकल्पांचे ते संयोजक होते. (प्रकल्पाचे अन्य संपादक : शांता शेळके, वसंत आबाजी डहाके व नीलिमा गुंडी).
परांजपे हे एक नाट्यसमीक्षकही आहेत.
पुस्तके
संपादन- भाषेतून भाषेकडे... आणि भाषांतराकडे[१]
पुरस्कार
संपादनपरांजपे ह्यांना अखिल भारतीय मराठी-साहित्य-महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा भाषाव्रती हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.[२]
बाह्य दुवे
संपादन- प्र.ना. परांजपे यांची मुलाखत Archived 2017-12-28 at the Wayback Machine.
संदर्भ
संपादनसंदर्भसूची
संपादन- भानू, सीमा. "भाषाव्रती". १३ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
- परांजपे, प्र. ना. भाषेतून भाषेकडे... आणि भाषांतराकडे.