प्रबुद्ध भारत
प्रबुद्ध भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म ग्रहण केला. यासोबतच ‘जनता’ वृत्तपत्राचे नाव बदलून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ करून टाकले. या पत्राच्या मुखशीर्षावर ‘अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र’ छापले होते.[१] बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंत हे पाक्षिक बंद पडले. ११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधीत बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहिर केले व १० मे २०१७ रोजी याचा पहिला अंक प्रकाशित झाला.[२]
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजात जागृती निर्माण करण्यासाठी अनेक वृत्तपत्रे व पाक्षिकांचे प्रकाशन आणि संपादन केले. त्यांना या वृत्तपत्र-पाक्षिकांनी दलित चळवळीला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. खरे तर डॉ. आंबेडकरच दलित पत्रकारितेचे आधार स्तंभ आहेत. ते दलित पाक्षिकाचे प्रथम संपादक, संस्थापक व प्रकाशक आहेत, त्यांच्या द्वारा संपादित वृत्तपत्र आजच्या पत्रकारितेसाठी एक मानदण्ड आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा निघालेले वृत्तपत्र-पाक्षिकांची नावे खालिलप्रमाणे आहेत - मूकनायक, जनता, समता, प्रबुद्ध भारत व बहिष्कृत भारत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समझू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी स्वतःला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरिजन’ इंग्लिश भाषेत प्रकाशीत करत होते. मात्र त्यावेळी बहुतांश दलित जनतेला इंग्रजीची सर्वसाधारण माहितीही नव्हती.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सृजनात्मक साहित्य (हिंदी)
- ^ "प्रबुद्ध भारत नव्या स्वरूपीत पुनप्रकाशित". 2017-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-01 रोजी पाहिले.