प्रदोषचंद्र मित्तर
प्रदोषचंद्र मित्र ऊर्फ फेलूदा (बंगाली: প্রদোষচন্দ্র মিত্র, ফেলুদা ; ) हा सत्यजित राय यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या कादंबरी मालिकेचा मुख्य काल्पनिक नायक होता.
प्रदोषचंद्र मित्तर | |
---|---|
लेखक |
सत्यजित रे |
माहिती | |
टोपणनाव | फेलूदा |
सहकारी | तोपेशचंद्र मित्र, लालमोहन गांगुली |
व्यवसाय | खाजगी सत्यान्वेषी (खाजगी गुप्तहेर) |
राष्ट्रीयत्व | बंगाली, भारतीय |
तळटिपा |
सुरुवात
संपादनसत्यजित रायांच्या "फेलूदार ग्योंईंदागिरी" (फेलूदाची हेरगिरी) या लघुकथेतून तो इ.स. १९६५ साली पहिल्यांदा वाचकांसमोर अवतीर्ण झाला. सत्यजित रायांचे आजोबा, उपेंद्रकुमार राय यांनी सुरू केलेल्या संदेश या बालकुमारांच्या मासिकामधे ही कथा प्रकाशित झाली.
व्यक्तिरेखा
संपादनकथांमधे वर्णल्याप्रमाणे, फेलूदाचे वय साधारण २७ वर्षे आहे, त्याची उंची ६ फूट २ इंच असून बांधा मजबूत आहे. दणकट शरीर असून त्याला मार्शल आर्टही येतात. असे शरीर असूनही तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या बुद्धीचा जास्त वापर करतो. त्याच्याजवळ ३२ कोल्ट रिव्हॅल्व्हर आहे ज्याचा अगदी क्वचितच वापर झालेला दाखवला आहे. आणि त्याने कोणालाही या शस्त्राने मारलेले नाही. मात्र सत्यजित रायांनी बनवलेल्या चित्रपटांमध्ये फेलूदाने बऱ्याचदा हे शस्त्र वापरले आहे. तो योगासने करतो. तो चारमीनार सिगरेटचा ओढतो. फेलूदा प्रचंड वाचतो.
फेलूदाला अगदी उत्तम वेषांतर करता येते. "जोय बाबा फेलूदा", मराठीत "गणेशाचे गौडबंगाल", या कथेमधे फेलूदा साधूचा वेश करतो. तर आणखी एका कथेत तोपेश आणि लालमोहनबाबूंनाही ओळखू येणार नाही असा वेश करून कोळी बनतो.
सत्यजित राय आणि फेलूदा हे ऑर्थर कॅनाॅन डाॅईलच्या शेरलॅाक होम्समुळे बरेच प्रभावीत झालेले दिसतात. बऱ्याच कथांत फेलूदा शेरलॅाक होम्स वाचताना दिसते. त्याची कामाची पद्धतही शेरलॅाक होम्सच्या "Science of deduction" सारखी आहे. जसे डाॅ. वॅटसन शेरलॅाक होम्सच्या कथा लिहीतात, तसे तोपेश फेलूदाच्या कथा लिहीतो. शेरलाॅकला आणि फेलूदाला धूम्रपानाचे व्यसन (वा आवड) आहे. शेरलाॅकप्रमाणेच फेलूदाही पैशांपेक्षा एखादे प्रकरण किती आव्हानात्मक आहे, हे पाहतो.
प्रकरणांची टिपणं फेलूदा त्याच्या एका वहीत काढतो. हे लिखाण तो एका सांकेतिक पद्धतीने लिहीतो. तोपेशला त्याने सांगितल्याप्रमाणे, या सांकेतिक पद्धतीत तो ग्रीक लिपीमधे आणि इंग्रजी भाषेमधे लिहीतो.
फेलूदा स्वतःला खाजगी "गुप्तहेर"न म्हणवता खाजगी "सत्यान्वेषी", सत्याचा शोध घेणारा, असे म्हणवतो.
मराठीतील फेलूदा
संपादनअशोक जैन यांनी फेलूदावरील बारा कादंबऱ्यांचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे. ही अनुवादित पुस्तके रोहन प्रकाशनाने छापली आहेत. या पुस्तकमालिकेमधे नवी आठ पुस्तके २०१४-१५ च्या सुमारास प्रकाशित झाली. त्यामुळे एकूण बारा[१]+चार[२]+चार[३]=वीस पुस्तकांचा हा संग्रह झाला आहे.
गोपा मुजूमदार यांनी राययांच्या मूळ बंगाली पुस्तकांचा इंग्रजीमधे अनुवाद केला होता. प्रसिद्ध इंग्रजी प्रकाशन पेंग्वीनने हा अनुवाद प्रकाशिक केला होता[४]. अशोक जैन यांनी गोपा मुजूमदारांच्या या इंग्रजी पुस्तकांचे मराठी भाषांतर केले आहे, असे ते वरील सर्व पुस्तकांच्या प्रस्तावनेत म्हणतात.
बाह्य दुवे
संपादन- "चाहत्यांचे संकेतस्थळ" (इंग्लिश व बंगाली भाषेत). 2010-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-08-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
संदर्भ
संपादन- ^ "संग्रहित प्रत". 2017-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-17 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2017-08-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-17 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2017-08-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-17 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2018-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-17 रोजी पाहिले.