प्रा. प्रदीप कदम (०२/१२/१९७६ - हयात ) हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते आहेत. त्यांची छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजीराजे, प्रेरणा युवकांसाठी,भक्ति-शक्ति , आजचा युवक आणि सामाजिक बांधिलकी,समाजप्रबोधन, विवेकानंद, यशवंतराव चव्हाण, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिग यांसारख्या अनेक विषयांवर महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर २०००हून अधिक व्याख्याने दिली आहेत.

ते चिखलीतील ( पिंपरी-चिंचवड) कॉनक्वेस्ट महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. आठवणितील विद्यार्थी, वेदांत- श्री ( पुणे) अंकासाठी त्यांनी विशेष लेखन केले आहे . रानवेली या ऑडिओ सीडीसाठी तसेच शब्दगंध साहित्यिक चळवळी साठी त्यांनी काव्यलेखन केले आहे .

प्रा. प्रदीप कदम यांना मिळालेले पुरस्कार संपादन

  • वीरभारती पुरस्कार २०१५( आंतरभारती संस्था,अहमदनगर)
  • स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय संस्काररत्न पुरस्कार
  • श्रीसाई संकल्प कार्यगौरव पुरस्कार ( साई फाऊंडेशन मावळ)
  • राजा छञपती साहित्य आभियान पुणे संस्थेचा कार्यगौरव

यांसारख्या अनेक पुरस्काराने सन्मानित.

प्रा. प्रदीप कदम यांचे इतर उल्लेखनिय कार्य संपादन

  • संतवीर ( मासिक)- संपादकिय सदस्य

बाह्य दुवे संपादन

 
विकिक्वोट
प्रदीप कदम हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.