प्रतिमा देवी
प्रतिमा देवी (१८९३ - १९६९) या एक भारतीय बंगाली चित्रकार होत्या. त्यांनी रवींद्रनाथ टागोर आणि नंदलाल बोस आणि यांच्याकडे कलेचा अभ्यास केला. त्यांनी १९१५ पासून पुढे टागोरांद्वारा संचालित इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्टमध्ये त्यांचे कार्य दर्शविले. त्यानंतर त्या पॅरिसला स्थायिक झाल्या, जेथे त्यांनी इटालियन ओले फ्रॅस्को पद्धतीने अभ्यास केला.[१]
कलेबरोबरच त्यांनी नृत्याचाही अभ्यास केला. शांतीनिकेतनमधील रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापित केलेल्या नृत्यशाळेतील नृत्य अभ्यासक्रमाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. टागोरांच्या नाट्यशास्त्रीय नाटकात आकार घेतलेला मुख्य प्रभाव म्हणून त्यांना श्रेय दिले जाते.[२]
सुरुवातीचे जीवन, विवाह आणि मृत्यू
संपादनप्रतिमा यांचा जन्म १८९३ साली भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनापूर्वी झाला. त्यांचा पहिला विवाह नीलनत मुखोपाध्याय यांच्याशी झाला तेव्हा त्या खूप छोट्या होत्या.[३]जे व्हा मुखोपाध्याय मरण पावले तेव्हा रविंद्रनाथ टागोर यांनी १७ वर्षीय प्रतिमा यांचा विवाह आपला मुलगा रथिंद्रनाथ टागोर यांच्याशी केला. रथिंद्रनाथ आणि प्रतिमा यांनी एक मुलगी दत्तक घेतली.आणि तिचे नाव नंदिनी ठेवले.१९४१ मध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या मृत्यूनंतर रथिंद्रनाथ आणि प्रतिमा यांचा घटस्फोट झाला. १९६९ मध्ये प्रतिमा यांचा मृत्यू झाला.[४]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Pratima Devi". www.visvabharati.ac.in. 2018-09-01 रोजी पाहिले.
- ^ Rajan, Anjana (2011-12-26). "Tagore's dance legacy and its relevance". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2018-09-01 रोजी पाहिले.
- ^ "Pratima Devi". www.visvabharati.ac.in. 2018-09-01 रोजी पाहिले.
- ^ "Mother of Stray Dogs - The Story of Pratima Devi | Magazine | RoundGlass". round.glass (इंग्रजी भाषेत). 2018-09-01 रोजी पाहिले.[permanent dead link]