दैनिक प्रजावाणी हे नांदेड शहरातील एक लोकप्रिय वृत्तपत्र आहे. सुधाकर डोईफोडे हे या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक होते. श्री. बियाणी हे या वृत्तपत्राचे मालक आहेत. हे वृत्तपत्र इंटरनेटवर उपलब्ध नाही.

या दैनिकाला १९७८, १९७९, १९८० या तीन वर्षी, सर्वोत्कृष्ट अग्रलेखांसाठीचे डहाणूकर पारितोषिक मिळाले होते.