प्रकृती हा इ.स. २०१० मधील ॲनिमेशन मराठी चित्रपट आहे. प्रकृती नावाची युवती चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा आहे, जी बुद्धांचा शिष्य आनंदच्या प्रेमात पडते. आणि ब्रह्मचर्यव्रत घेतलेल्या आनंद सोबत लग्न करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करते. जेव्हा गौतम बुद्धांच्या ही बाब लक्षात येते तेव्हा प्रकृतीला ते तिच्या प्रेमातील अशाश्वत गोष्टी तिला समजावून सांगतात. आपण भौतिक सुखांकडे आकर्षित झाल्याचे कळल्यावर प्रकृती बुद्धांशी क्षमा मागून आनंदशी मंगल मैत्रीचे नाते जपत भिक्खूणी बनून संघात सामील होते.

प्रकृती
दिग्दर्शन अविनाश साळुंके
गणेश गुप्ता
ममता सावंत
निर्मिती टी. सुरेंद्र
मधुकर भोसले
पटकथा टी. सुरेंद्र
अविनाश साळुंके
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ३० डिसेंबर २०१०
अवधी १० मिनिटे ४५ सेकंद
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

कथा संपादन

एक युवती नदीतून आपल्या घागरीत पाणी भरून रत्याने आपल्या घराकडे निघते. तेथून थोडे दूर भिक्खू आनंद त्यांच्या एका भिक्खू सहकाऱ्यासोबत भ्रमण करित असतात व वाटेत त्यांना तहान लागते. तेव्हा भिक्खू आनंद पाण्याचा शोध घेऊ लागतात व तेव्हा त्यांना ती घागरीत पाणी घेऊन येणारी युवती दिसते. आनंद त्या युवतीला पिण्याचे पाणी देण्याची विनंती करतात. तेव्हा ती युवती म्हणते की, "माझे नाव प्रकृती आहे व मी एक चांडालिका (अस्पृश्य) आहे, म्हणून मी पिण्याचे पाणी तुम्हाला देऊन तुम्हाला भ्रष्ट करू इच्छित नाही.” यावर आनंद म्हणतात की, " माझा संबंध पाण्याशी आहे, तुमच्या जातीशी नाही, म्हणून कृपया मला पाणी पाजा.” प्रकृती आनंदाला घागरीतले पाणी पिण्यास देते.

त्यानंतर प्रकृती अनेक दिवस आनंदाचा विचार करू लागते. दुसऱ्या कोणत्याही कामात तिचे लक्ष लागत नाही. ही प्रकृतीची अवस्था पाहून तिची आजी तिला याबद्दल विचारते, तेव्हा ती आपण बुद्ध शिष्य आनंदाच्या प्रेमाड पडलो असल्याचे सांगते. आनंदाशी लग्न करण्याची इच्छाही ती आजीला सांगते. हे ऐकूण आजी आपल्या नातीची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते. आजीला चेटकणीची कला अवगत असते व आनंदाला त्याद्वारे ती अडकण्याच्या प्रयत्न करते पण ती बुद्धापुढे तीची ही विद्या काम करत नाही. तेव्हा दुसरे प्रयत्न म्हणून आजी आनंदाला आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित करते. भोजन करून आनंद जेव्हा घरातून बाहेर पडू लागतात तेव्हा आजी आनंदाला थांबवून प्रकृतीची त्यांच्याविषयी मनात असलेल्या प्रेमाची भावना व लग्नाची इच्छा सांगते. आनंद आपण ब्रह्मचर्याचे व्रत घारण केल्याचे सांगून आपण कुठल्याही स्त्रीशी विवाह करू शकत नसल्याचे सांगून प्रकृतीशी लग्नास नम्रपणे नकार देतात. व घराबाहेर जाण्यास निघतात तेव्हा आजी घराची कडी लावून घेते व प्रकृती दुसऱ्या खोलित नेऊन आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न करते. परंतु आनंद तिच्याकडे आकर्षितला जात नाही व तो तिचा हात झटकून घरातून निघून जातात.

शिकवण संपादन

चित्रपटात शेवटी एक शिकवण दिलेली आहे :-

ज्या व्यक्तिवर आपण प्रेम करतो,
त्या व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही तर...

त्या व्यक्तिला नष्ट करणे म्हणजे विकृती!
त्या व्यक्तिशी मंगल मैत्री करणे म्हणजे प्रकृती!!

संदर्भ संपादन