डाॅ. प्रकाश जोशी हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी गणितात डाॅक्टरेट मिळवली आहे. ते मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात ते काम करत होते. जोशी अँटार्क्टिका, परिभ्रमण, निसर्ग, नकाशा, वास्तुरचना, गणित, तत्त्वज्ञान, पर्यावरण-शेती पासून ते ललित-विनोदी कथांपर्यंतच्या विषयांवर लिखाण करतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून जोशी यांचे ६०हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. जत्रा, दैवज्ञश्री, मेनका, ललना, वसंतश्री आदी दिवाळी अंकांतून त्यांच्या ४०-४५ विनोदी कथा छापून आल्या आहेत.

पुस्तके

संपादन
  • असा निसर्ग अशी माणसं (ललित)
  • आळशी माणसाचा विषय गणित (ललित)
  • ॠतुवैभव
  • कृषिप्रयोगांची गाथा (माहितीपर)
  • जीवनशैली : वैयक्तिक ते वैश्विक
  • जैवसुखात - निसर्गस्नेही घरात
  • द डार्कर साइड (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी, लेखक - कोडी मॅकफॅदियेन)
  • देवस्थानांच्या अवतीभवती
  • नकाशाच्या रेषांवरून चालताना : नकाशाचा आनंद, आस्वाद आणि आख्यायिका (ललित, माहितीपर, भूगोलाचॆ क्रमिक पुस्तक)
  • भुतापाठी राजकारण (विनोदी कथासंग्रह; एकूण १० कथा)
  • महाराष्ट्रातील जलाशय (माहितीपर)
  • रमणीय सागरकिनारे
  • विशाल हिमालय
  • The Silent Reformer (पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या राजेंद्र खेर यांनी लिहिलेल्या मराठी चरित्रााचा इंग्रजी अनुवाद), वगैरे.

पुरस्कार

संपादन
  • पदभ्रमणावरील एका पुस्तकाला कोमसापचा ललित साहित्य पुरस्कार
  • पर्यावरणावरील एका पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार