पॉल डाउनटन
(पॉल डाउन्टन या पानावरून पुनर्निर्देशित)
पॉल रुपर्ट डाउनटन (४ एप्रिल, १९५७:लंडन, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून १९७७ ते १९८८ दरम्यान ३० कसोटी आणि २८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टीरक्षक होता व उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करीत असे. हा केंट आणि मिडलसेक्सकडून काउंटी क्रिकेट खेळला.
याचे वडील जॉर्ज डाउनटन सुद्धा केंटकडून यष्टीरक्षक म्हणून खेळले.